बोनी कपूर आता टेन्शन फ्री! घरातील नोकरांच्या कोरोना चाचणीचाही आला रिपोर्ट

बोनी कपूर आता टेन्शन फ्री! घरातील नोकरांच्या कोरोना चाचणीचाही आला रिपोर्ट

मुंबई : चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील तीन नोकरांना कोरोनाची लागण झाली होती. त्या तीन नोकरांसहित बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुलींना क्वारंटाईन करण्यात आले होते. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींची कोरोना टेस्ट यापूर्वीच निगेटिव्ह आली होती आणि त्यापाठोपाठ आता बोनी कपूर यांच्या घरातील तीन नोकरांचीही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. या तिन्ही नोकरांनी कोरोनावर मात केली आहे.

बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराला 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ तीनेक दिवसांनी आणखीन दोन नोकरांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. या तिन्ही नोकरांना क्वारंटाईन करण्यात आले आणि त्यानंतर बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी यांनाही घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी यापूर्वीच निगेटिव्ह आली. त्यानंतर आता चौदा दिवसांनी बोनी कपूर यांच्या घरातील तिन्ही नोकरांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. बोनी कपूर यांनी एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, की आमच्या घरातील तीन स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्या तिघांनीही कोरोनावर मात केली आहे, असे मला कळविताना आनंद होत आहे. माझी तसेच माझ्या मुलींची कोरोना चाचणी यापूर्वीच निगेटिव्ह झाली आहे. आमचा 14 दिवसांचा क्वारंटाईन काळदेखील संपला आहे आणि आता आम्ही नवी सुरुवात करण्यास सज्ज आहोत.

कोरोनातून सगळे जण मुक्त व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. सगळ्यांनी आनंदी आणि सुरक्षित राहावे. सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे आणि तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. महापालिका कर्मचारी, पोलिस, डाॅक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांना धन्यवाद दिले आहेत. केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या कोरोनावर मात करूया असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com