
बॉलिवुड अभिनेता गोविंदाच्या वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करत असलेल्या मुलाचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.
मुंबई : बॉलिबुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवुडमध्ये चालणाऱ्या घराणेशाहीवर सगळीकडून जोरदार टीका केली जात आहे. प्रसिध्द गीतकार मनोज मुंतशिर यांनी ट्विटरवर एका मुलाचा डान्स व्हिडीओ पोस्ट करत बॉलिवुड मधील परिवारवाद तसेच स्टार किड्स असणाऱ्या अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे.
बॉलिवुड अभिनेता गोविंदाच्या वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करत असलेल्या मुलाचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. हा व्हिडोओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असून, लोक व्हिडीओवर कमेंट देखील करत आहेत. या व्हिडीओला कॅपशन देत मनोजने लिहीले आहे की, “असं वेड लावणारं टॅलेन्ट घराणेशाहीच्या शोरुममध्ये नाही तर केवळ मातीच्या घरांमध्येच पाहायला मिळतं. या मुलाची हिंमत वाढवा. या मुलाला प्रसिद्ध करा.” या व्हिडीओची सोशल मिडीयामध्ये चर्चा केली जात आहे.मनोज मुंतशिर हे सोशल मिडीयावर चांगलेच एक्टीव असतात, ट्विट, फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ते शतत सामाजिक प्रश्नावर मत व्यक्त करतात.
ऐसा पगला देने वाला talent, #NEPOTISM के showrooms में नहीं, सिर्फ़ मिट्टी के घरों में मिलेगा. बढ़ाइए बबुआ की हिम्मत, पहुँचाइए जहां तक पहुँचा पाएँ. pic.twitter.com/UUmFnMH2wK
— Manoj Muntashir (@manojmuntashir) June 26, 2020
"सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ | eSakal"
मनोज मुंतशिर हे नावाजलेले गीतकार, पटकथा लेखक आहेत. त्यानी त्यांच्या बॉलिवुड करिअर दरम्यान एक विलेन चित्रपटातील गलिंया, तेरे संग यारा, दिल मेरी न सुने तसेच अक्षय कुमारचा केसरी मधील तेरी मिट्टी सारखी अनेक गाणी लिहीली आहेत. त्यासाठी त्यांना स्टार गिल्ड आवॉर्ड, रेडिओ मिर्ची म्यूजिक अवॉर्ड यासारख्या पुरस्कारांनी नावजण्यात आलेले आहे.