Boycott Tiger 3 : 'आता तुझी वेळ आली!' आमीरनंतर सलमानवर निशाणा

बॉयकॉट बॉलीवूडचा ट्रेंड जोरदारपणे सुरु झाला आहे. त्यात आमिर खान, अक्षय कुमार यांना नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे.
Boycott Tiger 3 news
Boycott Tiger 3 news esakal

Boycott Tiger 3 : बॉयकॉट बॉलीवूडचा ट्रेंड जोरदारपणे सुरु झाला आहे. त्यात आमिर खान, अक्षय कुमार यांना नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. ज्या (Bollywood Movies News) चित्रपटांकडून शंभर ते दोनशे कोटींची अपेक्षा होती त्यांना आतापर्यत कसेबसे 50 कोटींपर्यत झेप घेता आली आहे. ती देखील सोशल (Boycott Bollywood Movies) मीडियावर झालेल्या अपप्रचारामुळेच. अन्यथा तेवढेही पैसै कमावण्याची संधी दोन्ही चित्रपटांना मिळाली नसती. गेल्या काही दिवसांपासून आमिरचा लाल सिंग चढ्ढा आणि अक्षयचा रक्षाबंधन ट्रोल होतो आहे. त्या (Aamir Khan) चित्रपटावर बहिष्काराची मागणी घालावी अशी मागणी होत आहे. त्याचे कारण काय, असं काय आहे या चित्रपटात अशा उत्सुकतेनं अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला असल्याचे बोलले जात आहे.

आमिर, अक्षयनंतर आता नेटकऱ्यांनी सलमान खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या आगामी टायगर 3 नावाच्या चित्रपटावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे सलमानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलीवूडचा भाईजान अशी सलमानची ओळख आहे. सलमानचा नवा चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात थिटएरमध्ये गर्दी करतात. ईदच्या वेळी नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा सुरु करणाऱ्या सलमानला आता नेटकरी दणका देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान, कतरिनाच्या एक था टायगरला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं सलमाननं टायगर 3 ची घोषणा करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मात्र सोशल मीडियावर लगेच बॉयकॉट टायगर 3 असा ट्रेंड सुरु झाल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांनी सलमानचा टायगर तीन पाहू नये असे आवाहन नेटकऱ्यांकडून केले जात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांच्याबाबत नेटकरी आक्रमक झाले आहेत. त्यावर कित्येक सेलिब्रेटींनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Boycott Tiger 3 news
Boycott Bollywood Trend : अर्जुन कपूरची युजर्सनी काढली लायकी; तुझे चित्रपट...

काल अर्जुन कपूरनं तर बॉयकॉट बॉलीवूड असं म्हणणाऱ्यांना सुनावले होते. खबरदार यापुढे कुणी ट्रोल केले तर अशी धमकीच त्यानं दिल्यानं नेटकऱ्यांनी त्यालाच ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी करिना कपूर, आलिया भट्ट, अनुराग कश्यप, विवेक अग्नीहोत्री यांनी देखील बॉयकॉट बॉलीवूड म्हणणाऱ्यांना सुनावले होते. सध्या ट्विटरवर बॉयकॉट टायगर 3 असा ट्रेंड सुरु झाला आहे. 2012 मध्ये सलमानचा एक था टायगर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता बॉक्स ऑफिसवर त्यानं प्रचंड कमाईही केली होती. नेटकऱ्यांनी आमिर खानला दणका दिल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा सलमानकडे वळवल्याचे दिसून आले आहे.

Boycott Tiger 3 news
Boycott Bollywood: 'आता बस्स, खूप झालं! नाहीतर...' अर्जुन कपूरचा संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com