Brahmastra Story Leak: मौनी रॉय नाही तर आलियाच देते रणबीरला धोका,कसं ते वाचा Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmastra BIG LEAK! Mouni Roy not the lead villain in Ranbir Kapoor-Alia Bhatt starrer? Major story details out

Brahmastra Story Leak: मौनी रॉय नाही तर आलियाच देते रणबीरला धोका,कसं ते वाचा

Brahmastra Story Leak: आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांचा 'ब्रह्मास्त्र' ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर जिथे एकापाठोपाठ एक बॉलीवूडच्या सिनेमांसाठी बॉयकॉटची मागणी केली जातेय तिथे अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' गाण्यावर इन्स्टाग्राम्स रील्स बनवले जात आहेत. आठ वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर रिलीजसाठी तयार असलेल्या या सिनेमाच्या कथेविषयी सगळ्यांनाच औत्सुक्य आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट,अमिताभ बच्चन,नागार्जुन,मौनी रॉय यांच्यासोबतच शाहरुख खान,आलिया भट्ट यांच्या कॅमिओची देखील चर्चा रंगलेली दिसत आहे. (Brahmastra BIG LEAK! Mouni Roy not the lead villain in Ranbir Kapoor-Alia Bhatt starrer? Major story details out)

हेही वाचा: 'Timepass 3' च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा; जाणून घ्या Good News...

सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर पाहून प्रत्येकजणानं अंदाज लावला आहे की मौनी रॉय या सिनेमात खलनायिकेच्या भूमिकेत आहे. पण आता सोशल मीडियावर सिनेमाची स्टोरी लीक झाल्याचा दावा केला जात आहे. बोललं जात आहे की सिनेमात निगेटिव्ह रोलमध्ये मौनी नाही तर आलिया भट्ट आहे.

हेही वाचा: अखेर प्रियंका चोप्राने सिद्ध केलंच की,ती देखील टिपिकल भारतीय आई, काय घडलं...

२०२२ मधील बहुप्रतिक्षित सिनेमांमधील एक आहे 'ब्रह्मास्त्र'. या सिनेमाच्या कथेविषयी आता दावे केले जात आहेत,जे केवळ मजेदार नाहीत तर भरपूर ड्रामा या दाव्यांमध्ये भरलेला आहे. टीझर-ट्रेलर वरनं हे आधीच स्पष्ट झालं आहे की रणबीर कपूर या सिनेमात शीवाच्या भूमिकेत आहे,जो अग्नि अस्त्र आहे. ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन यांची व्यक्तिरेखा शीवाला हे समजावताना दिसत आहे की,तो स्वतः अग्नि अस्त्र आहे. मौनी रॉय यामध्ये खलनायिकेच्या व्यक्तिरेखेत आहे आणि ती ब्रह्मास्त्रवर ताबा मिळवण्यासाठी आपल्या सैन्यासोबत दिसत आहे. आणि सर्वांनीच ट्रेलरमध्ये पाहिलं की,आलिया भट्ट एक साधी-सरळ मुलगी आहे,जिला रणबीर कपूरनं साकारलेल्या शीवा या व्यक्तिरेखेशी प्रेम होतं. पण नेटकऱ्यांनी मात्र आता दावा केला आहे की आलियाच खरी खलनायिका आहे. आणि ती शिवाशी गोड बोलून त्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी येते.

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांनुसार, सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत ईशा म्हणजे आलिया भट्टची व्यक्तिरेखा आहे. ती अग्नि अस्त्र म्हणजे शिवाच्या सहाय्याने इतर अस्त्रांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तर काही लोकांचे म्हणणे आहे की आलिया देखील स्वतः एक अस्त्र असते,ज्याचा खुलासा सिनेमाच्या शेवटी होतो.

हेही वाचा: लाल सिंग चड्ढा फ्लॉप पण आमिर म्हणतो,'अजूनही हरलो नाही', घेतला मोठा निर्णय...

ब्रह्मास्त्रमध्ये दीपिका पदूकोण कॅमियो रोलमध्ये असल्याचं बोललं जात आहे. अर्थात,ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप कळलेले नाही. पण बोललं जात आहे की, दीपिका जल अस्त्राच्या भूमिकेत दिसेल. तर अमिताभ बच्चन सिनेमाच्या कथेत शिवाच्या गुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Brahmastra Big Leak Mouni Roy Not The Lead Villain In Ranbir Kapoor Alia Bhatt Starrer Major Story Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..