Brahmastra : ब्रह्मास्त्र बनवतोय रेकॉर्ड; अडव्हान्स बुकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी

KGF २ आगाऊ बुकिंगच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे
Brahmastra Movie Latest News
Brahmastra Movie Latest NewsBrahmastra Movie Latest News

Brahmastra Movie Latest News मल्टीस्टारर चित्रपट ब्रह्मास्त्र (Brahmastra) रिलीज होण्यापूर्वीच अनेक रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून दोन दिवस बाकी आहेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक अडव्हान्स बुकिंगच्या (Advance Booking) यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ट्रेड विश्लेषक देखील चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती ट्विट करीत आहेत.

ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा वर्षातील असा बॉलिवूड चित्रपट बनला आहे ज्याची आगाऊ बुकिंग ही महामारीपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांप्रमाणेच केली जात आहे. महामारीनंतर यावर्षी KGF २ आगाऊ बुकिंगच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. या सुपरहिट चित्रपटानंतर ब्रह्मास्त्र हा वर्षातील दुसरा सर्वाधिक आगाऊ बुकिंग चित्रपट म्हणून उदयास आला आहे.

Brahmastra Movie Latest News
Lalit modi : ललित मोदींची गुगली; इंस्टा बायोमधून सुष्मिता सेनचा उल्लेख काढला

ब्रह्मास्त्रसाठी अडव्हान्स बुकिंग सुरू आहे. KGF २ साठी बॉक्स ऑफिसवर ४.११ लाख तिकिटे आगाऊ बुक करण्यात आली होती. अडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत रणबीर कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर सर्वांत मोठी ओपनर ठरलेल्या संजूचा रेकॉर्ड ब्रह्मास्त्रने उद्ध्वस्त केला आहे.

आगाऊ बुकिंगमध्ये संजूने बुधवारपर्यंत तीन प्रमुख राष्ट्रीय मल्टिप्लेक्समध्ये सुमारे १.०८ लाखांची आगाऊ बुकिंग केली होती. तर दोन दिवसांनंतर प्रदर्शित होणाऱ्या ब्रह्मास्त्रने मंगळवारीच आगाऊ बुकिंगचा हा आकडा पार केला होता. अशाप्रकारे रणबीरच्या सर्वाधिक बुकिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ब्रह्मास्त्रचे नाव अग्रस्थानी आले आहे.

Brahmastra Movie Latest News
तारा सुतारियाचा किलर लूक पाहून व्हाल आश्चर्यचकित

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रने तीन राष्ट्रीय थिएटर साखळी, पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसमध्ये पहिल्या दिवशी एक लाख तिकिटाची विक्री केली आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून ही महत्त्वाची माहिती दिली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर वीकेंडसाठी ब्रह्मास्त्रची दोन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

पहिल्या दिवशी ३० ते ५० कोटींचा गल्ला!

चित्रपट दुहेरी अंकात ओपनिंग करेल याची खात्री आहे. तो भूल भुलैया २ चा रेकॉर्ड अगदी सहज मोडेल, असे ट्रेड एक्सपर्ट अतुल मोहन चित्रपटाच्या ओपनिंग बिझनेसबद्दल म्हणाले. भूल भुलैया २ चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन १४ कोटी होते आणि सूर्यवंशीने पहिल्या दिवशी २६ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट अक्षय कुमारच्या सूर्यवंशीचा विक्रमही मोडू शकेल का? ब्रह्मास्त्र पहिल्या दिवशी ३० ते ५० कोटींचा गल्ला जमवू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com