Kesariya Song: ब्रह्मास्त्रचं 'केसरिया' चोरलेलं गाणं? संगीत चोरीचा आरोप

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र'ची प्रेक्षक ही गेल्या काही वर्षांपासून वाट पाहत आहेत.
 Kesariya Song news
Kesariya Song newsesakal

Bramhastra Song: अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रची प्रेक्षक ही गेल्या काही वर्षांपासून वाट पाहत आहेत. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे (Bramhastra movie) दिसून आले. कोरोनाच्या काळात ब्रह्मास्त्रचं शुटींग लांबणीवर पडल्यानं त्याचा मोठा निर्माते आणि दिग्दर्शक यांना बसला होता. (Ranbir Kapoor) त्यामुळे ब्रह्मास्त्र पाहण्यासाठी चाहत्यांना बराचकाळ वाट पहावी लागली. सध्या ब्रह्मास्त्र हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे (Bollywood Actor) कारण त्या चित्रपटातील केसरिया गाणं. हे गाणं चोरी केलं आहे. त्याच्यातील धुन ही चोरीची आहे. असा आरोप संगीतकारावर करण्यात आला आहे.

ब्रह्मास्त्रमध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) दिसणार आहे. रविवारी केसरिया हे गाणं व्हायरल झालं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. या गाण्याला प्रीतमनं संगीत दिलं आहे. तर अरिजितनं ते गायलं आहे. केसरिया आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. काहींनी त्या गाण्याला चोरी केलेलं गाणं म्हटलं आहे. तर काहींनी प्रीतमला ट्रोल केलं आहे. नेहमीप्रमाणे हे गाणं देखील चोरी केलं का असं त्याला म्हटलं आहे. यापूर्वी देखील संगीतकार प्रीतमवर संगीत चौर्याचा आरोप झाला होता. नेटकऱ्यांनी प्रीतमला संगीत कॉपी केल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं केसरिया गाण्यातील कोरसवर आक्षेप घेतला आहे. ट्विटवर सध्या हे गाणं ट्रेडिंग आहे. यावेळी नेटकऱ्यांनी वडाली ब्रदर्स दिवंगत लखविंदर वडाली आणि पुरन वडालीच्या चरखा नावाच्या लोकगीताचा परिचय करुन दिला आहे. ते गाणे ऐकल्यावर अनेकांनी प्रीतमला प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे खरा संगीतकार कोण आहे, यासगळ्य़ावर ब्रह्मास्त्रच्या मेकर्सकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

 Kesariya Song news
Video: दगडू पालवीची गोष्ट झकास ! पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास !

ब्रह्मास्त्रविषयी सांगायचे झाल्यास त्याचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्यात रणबीर, आलिया, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं असून ब्रह्मास्त्रचे बजेट 600 कोटी रुपयांचे आहे.

 Kesariya Song news
Video : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा ‘दे धक्का’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com