Brahmastra फ्लॉप? समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितली तीन कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmastra Hit or Flop

Brahmastra फ्लॉप? समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितली तीन कारणं

रणबीर आलिया या लव कपलचा ब्रम्हास्त्र हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून आता हा चित्रपट हिट होणार की फ्लॉप होणार याकडे बॉलीवुडचं आणि चाहत्यांचंही लक्ष लागलं आहे. चित्रपट समीक्षकांनीही चित्रपट पाहून त्यांची मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबत काय म्हटलंय ते वाचा.

ब्रम्हास्त्र या चित्रपटाविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवण्यात आली होती. 'चित्रपटावर बहिष्कार घाला' अशी मागणी केली जात होती. नेपोटीझम (घराणेशाही), वादग्रस्त विधानांवरून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीला वारंवार टार्गेट करण्यात आले होते.

या चित्रपटाबाबत तरण आदर्श यांनी भाष्य केलंय. आदर्श यांनी चित्रपटाला 5 स्टारपैकी 2 स्टार दिले आहेत. चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की, 'चित्रपटाने घोर निराशा केली आहे. व्हीएफएक्स चांगले असले तरी कथानक कमजोर आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध तर अधिकच निराश करणारा आहे. ब्रम्हास्त्र हा चित्रपट गेमचेंजर ठरला असता, मात्र या चित्रपटाने ही संधी गमावली आहे. चित्रपट चकचकीत आहे मात्र पोकळ आहे.'

या चित्रपटाची घोषणा 2014 साली करण्यात आली होती. विविध कारणांमुळे हा चित्रपट पुढे ढकलला गेला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही भूमिका असून शाहरूख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. अशी तगडी स्टारकास्ट असतानाही समीक्षकांनी या चित्रपटाला निराश करणारा म्हणणे हे चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी चिंतेची बाब आहे.

Web Title: Bramhastra Movie Released Today Its Hit Or Flop Disappointing Movie Says Critic About Ranbir Alia Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..