अमेरिकी सींगर ब्रिटनीने दिली गुड न्यूज..

Britney Spears:ब्रिटनी स्पीअर्स तिच्या दोन मुलानंतर तिसऱ्या मुलाची अपेक्षा करतेय
BRITANY SPEARS ANNOUNCED HER THIRD CHILD PREGNENCY ON INSTAGRAM
BRITANY SPEARS ANNOUNCED HER THIRD CHILD PREGNENCY ON INSTAGRAMesakal

जगप्रसिद्ध गायिका आणि गीतलेखक ब्रिटनी स्पीअर्स तिच्या दोन मुलानंतर तिसऱ्या मुलाची अपेक्षा करतेय.तब्बल पाच महिन्यानंतर कोर्टातील वाद मिटल्यानंतर ब्रिटनीने तिच्या तिसऱ्या बाळाच्या प्रेग्नंसीची बातमी दिली आहे.(singer)पॉप आयकॉनने ब्रिटनीवर लावलेल्या सर्व प्रतिबंधांना तोंड देत अखेर पाच महिन्यानंतर न्यायाधीशाने ब्रिटनीवर लागलेले सर्व प्रतिबंधनं काढून टाकलेत. त्यामुळे तिला परत आई होण्याचं सुख लाभलं आहे.त्यामुळे ती आई होणार हे तिला कळताच या बातमीचा आनंद व्यक्त करत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक अनोखा फोटो पोस्ट केलाय.(britney spears)

४० वर्षीय ब्रिटनीने तिच्या ४० मिलिअन फॉलोअर्सला ही गोड बातमी देण्यासाठी तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट टाकलीय.२००७ मधे झालेल्या कार हल्ल्यानंतर ब्रिटनीचे वडील जेमी स्पीअर्सने तिला त्यांच्या नेतृत्वात संरक्षणात ठेवले होते.हे संरक्षण जवळपास १४ वर्षे चालले. ब्रिटनीला असे प्रतिबंधनात बघून तिच्या फॅन्सलादेखील वाईट वाटत होते. त्यांनी यावर आवाज उठवला.अखेर जून २०२१ मधे ब्रिटनीने यातून कायेदशीररित्या बाहेर पडण्याचे ठरवले.त्यासाठी तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

BRITANY SPEARS ANNOUNCED HER THIRD CHILD PREGNENCY ON INSTAGRAM
Singer vaishali made kill her Death Threat : वैशाली माडेचा हत्येचा कट रचल्याचं वैशालीने सांगितलं

ब्रिटनी तिच्या शरीरात असलेल्या आयूडी (IUD) मुळे ईच्छा असतानाही आई होऊ शकत नव्हती.तिच्या शरीरातील आयूडी (IUD) काढण्यापासून तिला अडवले जात होते.असा तिने आरोप केला होता.तिच्या चाहत्यांमधेही या गोष्टीने प्रचंड संताप पसरला होता.त्यातून ब्रिटनीला मदत करण्यासाठी चाहत्यांनी एक चळवळ चालवली होती ज्याचे नाव होते 'फ्री ब्रिटनी' (#FreeBritney ).कायदेशीर चाललेल्या वादानंतर अखेर पाच महिन्यांनी ब्रिटनी स्पीअरने तिच्या आई होण्याची बातमी सोशल मीडियावर टाकलेली आहे.त्यामुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झालाय.

BRITANY SPEARS ANNOUNCED HER THIRD CHILD PREGNENCY ON INSTAGRAM
American Starlink भारतात घडविणार इतिहास; देणार High Speed इंटरनेट सेवा, यासाठी आजच रजिस्टर करा..

ब्रिटनीचा २८ वर्षीय पार्टनर सॅम असघरीने देखील यासंदर्भात त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला पोस्ट टाकली आहे.त्याने पितृत्व आणि त्याचा अर्थ काय याबद्दल सांगताना त्याच्या वडील होण्यावर आनंद व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com