esakal | दुसऱ्या लग्नाचे 'दोन दिवस', ब्रिटनीच्या तिसऱ्य़ा लग्नाची गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या लग्नाचे 'दोन दिवस', ब्रिटनीच्या तिसऱ्य़ा लग्नाची गोष्ट

दुसऱ्या लग्नाचे 'दोन दिवस', ब्रिटनीच्या तिसऱ्य़ा लग्नाची गोष्ट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हटकेपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जगप्रसिद्ध ब्रिटनी स्पियर्सच्या (britney spears) तऱ्हा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तिनं यापूर्वी अनेक गोष्टींमधून लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. अमेरिकी गायिका ब्रिटनीचा तिच्या वडिलांबरोबर सुरु असलेला वाद सर्वश्रृत आहे. तिच्या वडिलांनी तिला वेगवेगळ्या बंधनात ठेवले. त्यामुळे आपण किती मानसिक त्रास सहन केल्याचे तिनं सांगितलं आहे. आता ती एका वेगळ्य़ा कारणासाठी चर्चेत आली आहे. 39 वर्षीय ब्रिटनीनं आपला बॉयफ्रेंड सॅम असगरीशी (Sam Asghari ) साखरपूडा केला आहे. यात धक्कादाय़क बाब म्हणजे तिनं दोन दिवसांत आपलं अगोदरचं लग्न विसरुन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हाय़रल झाला आहे.

ब्रिटनीनं जो व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यात ती सॅमला आपली हिऱ्याची अंगठी दाखवत आहे. सॅमनं देखील तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेयर केला आहे. 2016 पासून त्यांच्या लव स्टोरीला सुरुवात झाली होती. स्लंबर पार्टी नावाच्या व्हिडिओचे जेव्हा चित्रिकरण सुरु होते तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पड़ले. आणि आता ते लग्न करणार आहेत. ब्रिटनी आता तिसऱ्यांदा लग्न विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या तिसऱ्या लग्नाची तयारी सुरु होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी ब्रिटनी ही केविन फेडरलिनशी विवाहबद्ध झाली होती. तिला दोन मुलंही आहेत. मात्र त्यांचा वैयक्तिक कारणास्तव घटस्फोट झाला.

त्यानंतर ब्रिटनीनं अमेरिकन अभिनेता आणि कॉमेडियन जेसन अलेक्झांड़रशी लग्न केले होते. मात्र ते लग्न केवळ दोन दिवसच टिकले. त्यानंतर तिनं तिसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनीच्या या निर्णयानं तिच्या चाहत्यांना नवल वाटलं आहे. ब्रिटनी तिच्या हटकेपणासाठी प्रख्यात आहे. तिनं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यात तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही चाहत्यांनी केल्या आहेत. आता ब्रिटनीचा सॅंमशी साखरपू़डा झाला आहे. त्यांचं हे नातं किमान लग्नापर्यत तरी टिकतं का. असा प्रश्न चाहत्यांनी पडला आहे.

हेही वाचा: Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

हेही वाचा: सिद्धार्थ गेला, शहनाजनं सोडलं जेवण...

loading image
go to top