
'बंटी और बबली 2'मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि श्रावणी ही नवी फ्रेश जोडी पडद्यावर दिसणार आहे. त्यांच्या जोडीला ओरिजिनल बंटी आणि बबलीच्या रोलमध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी दिसणार आहेत.
मुंबई - यशराज बॅनरखाली गाजलेल्या 'बंटी और बबली'च्या सिक्वेलचं डबिंग पूर्ण झालंय. आता लवकरच 'बंटी और बबली 2′ थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या भागातील कलाकारांनी एकत्रित पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
'बंटी और बबली 2'मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि श्रावणी ही नवी फ्रेश जोडी पडद्यावर दिसणार आहे. त्यांच्या जोडीला ओरिजिनल बंटी आणि बबलीच्या रोलमध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी दिसणार आहेत. पहिल्या भागामध्ये राणी मुखर्जीबरोबर अभिषेक बच्चन होता, हे प्रेक्षकांना आठवत असेलच. सैफ आणि राणी हे दोघे यापूर्वी 'हम तुम' आणि 'ता रा रम पम' या सिनेमांमध्येही एकत्र होते. त्या सिनेमांमधील केमिस्ट्रीची पुन्हा एकदा उजळणी 'बंटी और बबली 2′ मध्ये केली जाणार आहे.
सासू सुनेचे प्रेम ठरले लव जिहादचे कारण; तनिष्कच्या ''त्या'' जाहिरातीवर बंदी
पहिल्या भागाप्रमाणेच हा दुसरा भाग देखील फुल टू एन्टरटेनमेंट असणार आहे. नवोदित दिग्दर्शक वरुण शर्माकडे या दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
धोनीच्या मुलीला धमकावणा-यास कडक शिक्षा मिळावी; आर माधवन याने केले टविट्
यशराज फिल्म्सच्या 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है'साठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून वरुण शर्मावर जबाबदारी सोपवली गेली होती. आता या दुसऱ्या भागातील ज्युनिअर बंटी और बबली काय धमाल करतात हे देखील लवकरच समजेल.