Cannes 2022: कान्समध्ये दीपिकाकडे साऱ्यांच्या नजरा, चाहते भारावले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cannes Film Festival Bollywood actress Deepika Padukone

Cannes 2022: कान्समध्ये दीपिकाकडे साऱ्यांच्या नजरा, चाहते भारावले!

Bollywood Actress: दीपिका पदुकोण बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱी अभिनेत्री म्हणूनही तिची ओळख आहे. (Deepika Padukone) दीपिका वेगवेगळ्या वर्ल्ड क्लास ब्रँडची अम्बेसिडरही आहे. सध्या तिचा कान्स चित्रपट महोत्सवातील लूक व्हायरल झाला आहे. त्याला (Bollywood News) नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. दीपिका ही तिच्या हटक्या लूकसाठी नेहमीच चाहत्यांची पसंती मिळवताना दिसते. कान्समधील (Cannes 2022) तिचा लूक व्हायरल झाला आणि चाहत्यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं आहे. केवळ दीपिकाच नाहीतर यापूर्वी ऐश्वर्या देखील या चित्रपट महोत्सवाचा भाग झाली होती. यंदाच्या महोत्सवात ती सहभागी झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

दीपिकाचा ब्राऊन कलरमधील लूक तिच्या चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. दीपिकानं इंस्टावरुन तो लूक शेयर केला असून त्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. कान्स महोत्सवाच्या परीक्षकांच्या मेजवानी कार्यक्रमामध्ये दीपिका सहभागी झाली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दीपिकाचं कौतुक करताना तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. मल्टी कलरमधील तिच्या ड्रेसवर नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दीपिका त्या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. दीपिकानं आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं की, ती फ्रेंच रिव्हेरामध्ये आहे. तिनं व्हिडिओ शेयर करताना त्यात लॉस एंजेलिसपासून अकरा तासांच्या प्रवासाविषयी सांगितलं होतं.

हेही वाचा: Video Viral: कंगनाचा नादच नाय! नाकाला जीभ लावून अनन्याची उडवली खिल्ली...

2017 पासून दीपिका सातत्यानं कान्समध्ये सहभागी होत आहे. तिच्या आतापर्यतच्या वेगवेगळ्या लूक्सला प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळाला आहे. ज्युरी मेंबर्समध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे अध्यक्षस्थान विन्सेंट लिंडन यांच्याकडे असून त्यात दीपिका पदुकोण, रेबेका हॉल, असगर फरहादी, ट्रिनका, लाडज ली, नुमी रेपेस, जेफ निकोल्स, सहभागी झाले आहेत. 28 मे रोजी परिक्षक विजेत्यांची नावं घोषित करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कान्समध्ये भारताच्यावतीनं नयनतारा, तमन्ना भाटिया, पुजा हेगडे, नवाझुद्दीन सिद्धिकी, आर माधवन, ए आर रहमान सहभागी झाले आहेत.

हेही वाचा: Viral Video:आलिशान कारमधे फिरणारी नोरा नटून थटून स्कूटरवर का गेली?

Web Title: Cannes Film Festival Bollywood Actress Deepika Padukone Special Look Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top