'तांडव'नंतर मिर्झापूर वादात; निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

मुंबई - मिर्झापूर ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवरची सर्वात लोकप्रिय अशी वेब सिरीज आहे. यातील पात्र, कलाकारांचा अभिनय आणि संवाद याचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले होतं. विशेषत: कालीन भैय्याचं पात्र साकारणाऱ्या पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचं कौतुक जास्त करण्यात आलं. मिर्झापूरच्या पाहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर दुसरा भागही आला.

मुंबई - मिर्झापूर ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवरची सर्वात लोकप्रिय अशी वेब सिरीज आहे. यातील पात्र, कलाकारांचा अभिनय आणि संवाद याचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले होतं. विशेषत: कालीन भैय्याचं पात्र साकारणाऱ्या पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचं कौतुक जास्त करण्यात आलं. मिर्झापूरच्या पाहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर दुसरा भागही आला. पहिल्या भागाप्रमाणेच या भागालाही प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आता ही वेबसिरीजसुद्धा वादात अडकण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तांडव वेबसिरीजविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तांडवच्या दिग्दर्शक, निर्मात्यांना माफीही मागावी लागली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता 'तांडव'नंतर मिर्झापूर वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या मिर्झापूर  मतदारसंघाच्या खासदार आणि अपना दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनी मिर्झापूरच्या  निर्मात्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. अॅमेझोन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मसह मिर्झापूर या वेबसिरीज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरीज प्रदर्शित झाल्यापासूनच त्याच्याविरोधात अनेकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. रितेश सिद्धवानी, फरहान अख्तर आणि भौमिक गोन्धालिया हे मिर्झापूर वेबसिरीजचे निर्माते आहेत.

मानसीच्या लग्नाला यायचं हं! पाहा फोटो

मिर्झापूर वेबसिरीज विरोधात अरविंद चतुर्वेदी यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मिर्झापूरच्या कोतवाल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. मिर्झापूर वेब सिरीजमुळे प्रादेशिक, सामाजिक आणि धार्मिक भावना दुखवल्या जात आहेत असे अरविंद चतुर्वेदी यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.

'सनी भाऊ बोलले, भारतीयांना कधीही कमी समजू नका'

नुकतंच तांडव या वेब सिरीजला मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही तांडव वेबसिरीज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तांडव वेबसिरीजचे दिग्दर्शक, निर्माता अली अब्बास जफर यांनी सोशल मीडियावरून माफीनामाही प्रसिद्ध केला. तांडव आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्यावतीने बिनशर्त माफी त्यांनी मागितली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case registered against mirzapur