Aarti Mittal: बॉलीवूडमधील मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड.. कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात

आरती मित्तल काही मालिकात काम करण्यासोबतच कास्टिंग डायरेक्टरचं देखील काम पाहत होती. गोरेगाव येथून तिला अटक केली आहे.
Casting Director aarti mittal arrested for running sex racket
Casting Director aarti mittal arrested for running sex racket Instagram

Aarti Mittal: सोमवारी 17 एप्रिल,2023 रोजाी क्राइम ब्रान्च युनिट ११ ने कारवाई करत फिल्म इंडस्ट्रीत चालणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. हे सेक्स रॅकेट बॉलीवूडची कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल चालवायची असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे,अशी माहिती मुंबईच्या क्राइम ब्रान्चनं दिली.

गोरेगावमधील एका ठिकाणाहून दोन मॉडेल्सना या सेक्स रॅकेटच्या जाळ्यातून वाचवण्यात आलं आहे आणि त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्यात आलं. मॉडेल्सनी पोलिसांना सांगितलं की आरतीनं त्यांना १५-१५ हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता.(Casting Director aarti mittal arrested for running sex racket details)

Casting Director aarti mittal arrested for running sex racket
Shehnaaz Gill: बिग बॉस 13 मधील सगळ्यात स्वस्त कंटेस्टंट होती शहनाझ गिल.. मानधनाविषयी खुलासा करत म्हणाली..

पोलिसच खोटे ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले होते आणि त्यानंतर सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला गेला. आरती मित्तलला याप्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. क्राइम ब्रान्चच्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस इन्स्पेक्टर मनोज सुतार यांना या सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी एक टीम बनवली आणि त्यातील एकाला ग्राहकाच्या रुपात पाठवलं. त्यानंतर आरती मित्तलला तिथं बोलावलं गेलं आणि त्याच्या मित्रांसाठी दोन मुली हव्या आहेत असं सांगितलं.

आरतीनं त्यासाठी ग्राहक बनून गेलेल्या पोलिसांकडे ६० हजार रुपयांची मागणी केली. आरता जेव्हा मुलींच्या बदल्यात ६० हजार रुपयांचं डील करत होती ती योग्य संधी साधून पोलिसांनी तिला पकडलं.

हेही वाचा: What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Casting Director aarti mittal arrested for running sex racket
Sanskruti Balgude: आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा..

आरती कास्टिंग डायरेक्टरच नाही तर अभिनेत्री देखील आहे. तिनं 'अपनापन' सारख्या मालिकेमधनं काम केलं आहे. त्या शो मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री ठाकूर मुख्य पात्र साकारत होती. काही दिवस आधी आरतीनं सोशल मीडियावर पोस्ट केली होती की ती लवकरच आर माधवनसोबत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Casting Director aarti mittal arrested for running sex racket
Kapil Sharma सर्वांसमोर पूजा हेगडेला म्हणाला,'ऑरेंज कुल्फी..',यावर सलमानची कमेंट ऐकून अभिनेत्री लाजेनं लालबूंद..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com