कहर झाला !! कलकत्त्यात रणबीर आलियाचे पुतळे करून लावलं लग्न... | ranbir alia in kolkatta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir alia kolkata wedding

कहर झाला !! कलकत्त्यात रणबीर आलियाचे पुतळे करून लावलं लग्न...

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि बॉलीवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट (alia bhatt ) यांच्या लग्नाच्या चर्चा गेले अनेक दिवस बी टाऊनमध्ये रंगल्या होत्या. अखेर आता दोघांनीही एकमेकांचे जीवनसाथी बनण्याचे निश्चित केले. काल रणबीरच्या पाली हिल येथील वास्तू या निवासस्थानी दोघांनीही लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरमध्ये गेले अनेक वर्षांची मैत्री होती. २०१५ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. मात्र दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली न्हवती. मात्र सोनम कपूरच्या लग्नात दोघेही उघडपणे मीडियासमोर आले. आणि तेव्हापासून यांच्या रेलशनशिपच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु झाल्या. आणि काल अखेर दोघे ही सप्तपदी घेऊन एकमेकांचे जीवनसाथी बनले.

हेही वाचा: Ranbir Alia Wedding: सासू म्हणतेय सुनबाई गोड आहे, तर नणंद म्हणतेय..

हा सोहळा अत्यंत दिमाखात रणबीर कपूरच्या वांद्रे येथील वास्तू या निवासस्थानी पार पडला. या लग्नाला काही मोजक्याच पण दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. करण जोहर, आकाश अंबानी, महेश भट आणि कपूर कुटुंबीय यावेळी विवाहस्थळी होती. हे लग्न आपल्याला पाहता यावे यासाठी अनेक चाहते गेली आठवडाभर इकडून तिकडे धावत होते. चेंबूरचे आरके स्टुडिओ असो, कपूर यांचे निवासस्थान किंवा वांद्रे येथील वास्तू बंगला. पापाराझी आणि अनेक चाहते दिवसरात्र या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी उभे होते. अखेरी गुरुवारी दुपारी एक मिठाईचे ताट वास्तू बंगल्यातून बाहेर आले आणि लग्न लागल्याचे जाहीर झाले.

हेही वाचा: पाहा रणबीर आलियाच्या लग्नाचा अल्बम, कोण आहेत वऱ्हाडी ? कसा होता थाट?

त्यानंतर रात्री ८ च्या दरम्यान रणबीर आणि आलीय माध्यमांसमोर आले. त्यांनी माध्यमांना भेट दिली. यावेळी रणबीरने आलियाला उचलून घेतले. हा सोहळा अनेकांनी सोशल मीडियावर अनुभवाला. लाखो चाहत्यांनी त्यांना समाज माध्यमातून शुभेच्छाही दिल्या. पण असे काही चाहते आहेत ज्यांना प्रत्यक्ष या सोहळ्याला हजेरी लावायची होती. त्यापैकीच कलकत्त्यातील काही चाहत्यांनी कहर केला आहे. (ranbir alia wedding and kolkata)

या चाहत्यांनी दोन पुतळे तयार करून त्याला कलकत्याच्या संस्कृती नुसार कपडे चढवली आहेत. त्या पुतळ्यांना रणबीर आणि आलिया यांच्या चेहऱ्याचा मुखवटा घातला आहे. आणि रीतसर पद्धतीने त्यांचे लग्न लावले आहे. हे लग्न लावताना वरात,डोली, धार्मिक विधी सर्व काही सोपस्कार या चाहत्यांनी पूर्ण केले आहेत. शिवाय या लग्नाचे फोटो त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केले आहेत. काही तासातच हे फोटो व्हायरल आले असून अनेक अनेकांनी या प्रकारची खिल्ली देखील उडवली आहे.

Web Title: Ranbir Alia Statue Wedding Ion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..