'तानाजी'च्या टीमचे उदयनराजेंकडून कौतुक अन् व्यक्त केली 'ही' अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही पहिल्याच दिवशी 16 कोटींची कमाई केली आहे.

मुंबई : 'तानाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचे कौतुक सर्वत्र सुरु असताना आता माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत यापुढेही आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही पहिल्याच दिवशी 16 कोटींची कमाई केली आहे. अजय देवगनचा हा 100 वा सिनेमा आहे. तसेच अजय देवगन आणि काजोल तब्बल 10 वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. अजय देवगनच्या तोडीला तोड असा अभिनेता सैफ अली खानची भूमिका देखील वाखाण्याजोगी आहे. या चित्रपटाच्या सुरवातीलाच उदयनराजे यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

'तानाजी'ने बॉक्स ऑफिसवरही फडकावला झेंडा; पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई

उदयनराजेंनी ट्विट करत म्हटले आहे, की "तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे. त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तसेच यापुढेही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.' या ट्विटसह त्यांनी अजय देवगन, काजोल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरला टॅग केले आहे.

नवा चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरिअर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chatrapati Udyanraje Bhosale appriciate Tanhaji Movie and Ajay Devgan