
Prateik Babbar : 'आमचं नातं कुणाला सांगायचं नव्हतं!' स्मिता पाटील यांच्या प्रतिकची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Priya Banerjee tv entertainment actress : बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर त्याच्या हटक्या अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यानं आपल्या अभिनयानं मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. अशातच तो त्याच्या वैयक्तिक कारणामुळे देखील चर्चेत राहिला आहे.
प्रतिक आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे. व्हँलेटाईन डे च्या निमित्तानं त्यानं आपल्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. ते फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. प्रियानं आता त्यांच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला आमचे प्रेम, रिलेशन हे जगासमोर आणायचे नव्हते. अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे.
Also Read - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही
यंदा १४ फेब्रुवारीला या कपलनं त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या फोटोमध्ये प्रतिक हा प्रियसोबत दिसतो आहे. चाहत्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया देखील भन्नाट आहे. काही दिवसांपासून प्रतीक आणि प्रियाच्या रिलेशनची चर्चा रंगली होती. दुसऱ्या फोटोमध्ये प्रतिक आणि प्रियाची वेगळी केमिस्ट्री पाहायला मिळते. आता तर चाहत्यांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.
प्रतिकचं पहिलं लग्न हे सान्या सागर सोबत झालं होतं. २३ जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र ते काही फार काळ टिकलं नाही. एका वर्षाच्या आता त्यांचा संसार मोडला. ते दोघेही वेगळे झाले. प्रियाविषयी सांगायचं झाल्यास ती टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. प्रिया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे.