Chhattis Guni Jodi: 36 गुण जुळणार की 36 चा आकडा.. येतेय भन्नाट मालिका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhattis Guni Jodi new marathi serial on zee marathi

Chhattis Guni Jodi: 36 गुण जुळणार की 36 चा आकडा.. येतेय भन्नाट मालिका..

सध्या झी मराठी वाहिनी दर्जेदार मालिका घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या वाहिनीने कूस बदलली आणि 'तु चाल पुढं', 'बये दार उघड' सारख्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. या मालिका चर्चेत असतानाच झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी एक नवीन वर्षाची भेट आणली आहे. लवकरच एक भन्नाट विषय घेऊन ही मालिका प्रक्षेपित होणार आहे.

(Chhattis Guni Jodi new marathi serial on zee marathi )

हेही वाचा: Majhi Tujhi Reshimgath: सांभाळून पळ! हाडं मोडतील.. हिल्स घालून पळणारी प्रार्थना बेहेरे झाली ट्रोल..

‘३६ गुणी जोडी’ असे या मालिकेचे (marathi serial) नाव असून ह्या नवीन मालिकेचा प्रोमो नुकताच झळकला. आणि थोड्याच कालावधीत या मालिकेची चर्चा होऊ लागली. ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’ अशी या मालिकेची टॅगलाइन आहे. ह्या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत. या दोन परस्पर विरोधी आणि एकमेकांच्या नतावर टिचून नडणाऱ्या वेदान्त आणि अमूल्याची जोडी कशी जमणार ही पाहण्यासारखं आहे.

हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Apurva Nemlekar: अण्णांची शेवंता दिसणार मांजरेकरांच्या चित्रपटात.. अपूर्वानेच सांगितली..

वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे. शशांक सोळंकी यांची निर्मिती असलेल्या या मालिकेचं लेखन अनिल देशमुख यांनी केलं असून, दिग्दर्शन हरीश शिर्के यांचं आहे.

या मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि आयुष संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, अनुष्का ही झी मराठीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती. तर आयुष 'बॉस माझी लाडाची' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ही नवीन ३६ गुणी जोडी के धमाल करते ही लवकर कळेलच.