Salman Yusuf Khan: कोरिओग्राफर सलमान युसुफसोबत बेंगळुरू एअरपोर्टवर घडली धक्कादायक घटना, व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला कन्नड भाषेत बोलण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीनंतर त्याने इनस्टाग्रामवर लाइव्ह येत घडलेली हकिकत सांगितली आहे.
salman yusuf khan
salman yusuf khanSakal

'डान्स इंडिया डान्स सीझन 1' चा विजेता सलमान युसूफ खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची कहाणी सांगितली. बुधवारी तो दुबईला जाण्यासाठी बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता.

त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला कन्नड भाषेत बोलण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीनंतर त्याने इनस्टाग्रामवर लाइव्ह येत घडलेली हकिकत सांगितली आहे.

विमानतळावरील व्हिडिओ शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला जात आहे आणि मी एका इमिग्रेशन अधिकाऱ्याला भेटलो जो माझ्याशी कन्नडमध्ये बोलत होता. मी त्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला की मी कन्नड भाषा समजू शकतो पण मी नीट बोलू शकत नाही.

मात्र तरीही तो अधिकारी माझ्याशी कन्नड भाषेतच बोलू राहिला. त्याने माझ्या पासपोर्टकडे बोट दाखवून त्यावरील माझे नाव, माझे जन्मस्थळ, माझ्या वडिलांचे नाव आणि त्यांचे जन्मस्थळ यांकडे लक्ष वेधलं. तू आणि तुझे बाबा बेंगळुरूमध्ये जन्माला आले आणि तरी तुम्हाला कन्नड बोलता येत नाही असे ते मला म्हणाले. त्यावर मी म्हणालो की बेंगळुरूमध्ये जन्माला आल्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला भाषा आलीच पाहिजे.’

salman yusuf khan
Suyash Tilak: आता सुयश टिळकला 'कार्तिक देवराज अण्णा' म्हणायचं.. नवा लुक पहा म्हणजे कळेल..

सलमान पुढे म्हणाला, “मी बंगळुरूमध्ये जन्मलो आणि जगभर फिरू शकतो. मी सौदी अरेबियात लहानाचा मोठा झालो. त्यावर त्या अधिकाऱ्यांनी मला म्हटलं,जर तुम्हाला कन्नड बोलता येत नसेल तर मी तुमच्यावर संशय घेऊ शकतो’, असं त्याने पुढे लिहिलं. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणादरम्यान देशात न राहिल्यामुळे कन्नड भाषा येत नसल्याचं सलमानने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं. फक्त मित्रांमुळे थोडीफार भाषा समजत असल्याचं तो म्हणाला.

हिंदी बोलण्याचा सलमानने प्रयत्न केला तरी त्याला कोणत्याही गोष्टीसाठी संशयित मानलं जाऊ शकतं, असं संबंधित अधिकारी म्हणाला. वारंवार सलमानने त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न देखील केला, पण तरीही ते ऐकण्यास तयार होते.

“मी त्या अधिकाऱ्याला म्हणालो तुमच्यासारखे अशिक्षित लोक जर या देशात राहत असतील तर हा देश कधीच मोठा होणार नाही. पण त्यावरही त्यांनी मान खाली घालून बडबडण्यास सुरुवात केली”, असं सलमानने पुढे लिहिलं.

बंगळुरूचा असल्याचा मला अभिमान आहे, पण जे काही घडले ते मान्य नाही, असे सलमानने शेवटी सांगितले. गौहर खाननेही त्याला साथ दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com