'CID' च्या पोलीस इन्स्पेक्टरचा बाथटब व्हिडिओ, भर जंगलात 'बिकीनी' अवतार|CID Fame Actress Megha Gupta Bikini Look | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CID Fame Actress Megha Gupta Bikini

'CID' च्या पोलीस इन्स्पेक्टरचा बाथटब व्हिडिओ, भर जंगलात 'बिकीनी' अवतार

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्यामध्ये सीआयडीचं नाव (CID Serial) सांगता येईल. ही मालिका अजुनही प्रेक्षकांच्या फेव्हरेट मालिकेच्या यादीत असते. नवनवे विषय, त्याची प्रभावी मांडणी, आणि मोठ्या चातुर्यानं होणारा तपास प्रेक्षकांच्या आवडीचा भाग आहे. या मालिकेमध्ये काम करणारे कलाकारही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. सध्या (entertainment News) सीआयडीमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका कऱणारी मेघा गुप्ता चर्चेत आली आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा फॉलोअर्सही आहे. मेघाचा भलताच बोल्ड लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे तिला जशा त्या कौतुकाच्या कमेंट्स आल्या आहेत. तसं तिला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.

मेघाचा चाहतावर्ग मोठा आहे. सीआयडीमधून तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होतं. आताही तिच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. कारण सीआयडी मालिकेमध्ये दिसणारा तिचा लूक आणि सोशल मीडियावर दिसणारा तिचं दिसणारं वेगळं रुप याची नेहमीच चर्चा होत असते. सीआयडी मालिकेमध्ये मेघानं अनेक वर्षांपासून काम केले आहे. अजुनही त्या मालिकेतील अनेक कलाकारांप्रती प्रेक्षकांची विशेष रुची आहे. सीआयडीमधून मेघाच्या वाट्याला लोकप्रियता दिसुन येते. त्या मालिकेत तिनं इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे. यापूर्वी मेघानं वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आपल्या हटके स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

मेघानं तिच्या इंस्टावर काही बोल्ड फोटो व्हायरल केले आहे. त्यामधील तिच्या हॉट अंदाजानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेघाच्या अदांवर प्रेक्षक फिदा झाले आहे. त्या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की, ती भर जंगलात एका बाथटबमध्ये बसली आहे. मेघाच्या त्या मोहक रुपाकडे पाहून चाहते घायाळ झाले आहे. मेघाच्या चाहत्यांना देखील तिचा हा अंदाज आवडला आहे. तिच्या त्या फोटोंवर कमेंट करताना चाहते थांबत नाही. यापूर्वी मेघा गुप्तानं कुमकुम, ममता, आहट, ड्रीम गर्ल, आयुषमान भव सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सीआयडी बरोबरच ती सावधान इंडिया, कोड रेड आणि एमटीव्ही बिग एफमध्ये देखील दिसली आहे.

हेही वाचा: 'नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा…'; केंद्राची TV चॅनल्सना ॲडव्हायझरी

Web Title: Cid Fame Actress Megha Gupta Bikini Look Viral Users Bold Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top