Drishyam 2 मध्ये ACP प्रद्युमन आणि त्यांच्या सीआयडी टीमची एन्ट्री, सोडवणार का विजय साळगावकरची केस? Ajay Devgan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CID team ACP Pradyuman squad ajay devgan starer drishyam 2

Drishyam 2 मध्ये ACP प्रद्युमन आणि त्यांच्या सीआयडी टीमची एन्ट्री, सोडवणार का विजय साळगावकरची केस?

Drishyam 2 : दृश्यम १ मध्ये' २ आणि ३ ऑक्टोबरला काय घडले हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत 'दृश्यम 2' मधून देणार आहे. (CID team ACP Pradyuman squad ajay devgan starer drishyam 2)

हेही वाचा: Sonalee Kulkarni: निस्ता गोडवा! अप्सरा की चॉकलेटचा झरा...

अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एसीपी प्रद्युमन यांची सीआयडी टीम 'दृश्यम 2' मध्ये स्क्रीनवर दिसणार आहे.

हेही वाचा: भर थंडीत अनघाला होतंय गरम...

21 वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवणारा सीआयडी हा शो या चित्रपटाद्वारे पडद्यावर पुनरागमन करणार आहे. एसीपी प्रद्युमन यांची टीम चित्रपटाच्या विशेष तपासाचा भाग असेल. ती आयजी मीराला सपोर्ट करताना दिसणार आहे. चित्रपटात एसीपी प्रद्युमनची टीम स्पेशल अपिअरन्स म्हणून दिसणार आहे. हे कळताच चाहते या चित्रपटासाठी आणखीनच उत्सुक झाले आहेत. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एसीपी प्रद्युमन इन्स्पेक्टर अभिजीत आणि इन्स्पेक्टर दयासोबत दिसत आहेत. हा फोटो एका चौकशी कक्षाचा आहे.

हेही वाचा: Hera Pheri 3 मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री, अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणार की केलं रीप्लेस? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी शिवाजी साटम यांनी त्यांच्या टीमसोबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये सीआयडी शोचे निर्माते बीपी सिंह देखील दिसले होते.

हेही वाचा: Money Laundering Case: जॅकलिनवर अजूनही टांगती तलवार, जामीन मिळाला पण...

आता 'दृश्यम 2' चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन आणि इशिता दत्ता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच मृणाल जाधव अजयच्या लहान मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा 2 आणि 3 ऑक्टोबरच्या दिवसांभोवती फिरणार आहे. या चित्रपटात स्वामी चिन्मयानंदजींचे आश्रम, हॉटेलचे बिल, सीडी आणि महासत्संगाशी संबंधित रहस्ये देखील दाखवली जाणार आहेत. विजय साळगावकर आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीत सापडताना दिसतील आणि त्यातून ते कसे बाहेर पडतील, हे 18 नोव्हेंबरला कळेल.