लॉकडाऊनमध्ये तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला मिस करताय? तर मग पल्लवी पाटीलच्या 'या' गाण्याशी व्हाल एकरुप..

pallavi
pallavi

मुंबई-  तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भेटीची ओढ तुम्हांलाही कधी ना कधी लागली असेलच ना? त्यांनी दिलेली वचनं, त्यांच्या आठवणी सतत स्मरत असतील... त्यांना डोळे भरुन पाहण्यासाठी मन आसुसले असेल... त्यांचा स्पर्श हवाहवासा वाटत असेल... प्रेमाने मारलेली हाक ऐकण्यासाठी कान आतुर झाले असतील... प्रेम म्हटलं की या सर्व भावना आपसूकपणे आल्याच..पण थांबा...सध्या लॉकडाऊन सुरु आहे..लॉकडाऊनमध्ये तुम्हाला त्यांचा सहवास जरी नाही लाभला तरी त्यांच्या गोड आठवणीत रमायला नक्की आवडेल नाही का?.. तुम्ही तुमच्या प्रेमापासून दूर असाल तर नक्कीच तुम्हाला त्या प्रेमाची ओढ लागली असेल..मात्र या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही तुमच्या प्रियजनांपासून दूर जरी असलात तरी हे गाणं तुम्हाला त्यांची केवळ आठवण करुन देणार नाही तर ते ऐकून आणि पाहून तुम्ही त्यांच्या हव्याहव्याश्या वाटणा-या सहवासाचा अनुभव घ्याल..

लॉकडाऊनमध्ये तुमच्या या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठीच रेड बल्ब म्युझिक ‘येशील ना’ हे रोमँटिक अनप्ल्गड गाणं नुकतंच आपल्यासाठी घेऊन आले आहेत. हे रोमँटिक गाणं अभिनेत्री पल्लवी पाटीलवर चित्रित करण्यात आलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Coming soon !!!

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil) on

या गाण्यात टिपलेली पल्लवीची अदा, तिच्या चेह-यावरील भाव, तिचे सौंदर्य तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पाडतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गाण्यातील सूर आणि त्या सोबतचे शब्द आणि पल्लवीच्या चेह-यावरील अचूक भाव प्रेक्षकांना मोहात पाडतील.

ज्याप्रमाणे ‘येशील ना’ या रोमँटिक अनप्ल्गड गाण्याचे बोल आणि गीत थेट मनाला भिडतात त्याचप्रमाणे या गाण्याचे व्हिज्युअल्स देखील मनावर एक वेगळीच जादू करुन जातात. गाण्यातील एकूण एक फ्रेम अतिशय बोलकी आणि आकर्षक वाटते आणि याचे संपूर्ण श्रेय या गाण्याचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर अभिषेक जावकर यांना जाते.  डॉ. श्रीहरी गोकर्णकर यांनी लिहिलेल्या या गाण्यातील प्रत्येक शब्द हे मनातल्या सर्व भावनांना जागे करतात आणि आपण नकळतपणे गाण्यांच्या शब्दांत गुंग होऊन जातो. तसेच मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि संगीत दोन्ही केवल वाळंज यांचे आहे आणि संगीत पाटील हे म्युझिक प्रोग्रामर आहेत.

this cinematic and exquisitely shot song yeshil na featuring actress pallavi patil  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com