esakal | चित्रिकरणात 'त्यांना'ही सहभागी होऊ द्या; 'सिंटा'चे राज्यपालांना पत्र...
sakal

बोलून बातमी शोधा

cinta

राज्यपालांच्या भेटीमध्ये मनोज जोशी यांनी सिंटा तसेच तिचा इतिहास व टीव्ही इंडस्ट्रीत सिंटा करीत असलेली कामगिरी तसेच विविध राबविलेले विविध उपक्रम याची माहिती राज्यपालांना दिली. सुमारे चाळीस मिनिटांची ही भेट झाली.

चित्रिकरणात 'त्यांना'ही सहभागी होऊ द्या; 'सिंटा'चे राज्यपालांना पत्र...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सध्या टीव्ही मालिकांचे चित्रीकरण हळूहळू सुरू झाले आहे. सरकारच्या नियमानुसार हे चित्रीकरण सुरू आहे. विविध प्रॉडक्शन हाऊसेस सरकारचे नियम पाळत आहेत. सरकारच्या नियमांमध्ये 65 वर्षांवरील कलाकाराला चित्रीकरणात सहभागी होता येणार नाही, असाही एक नियम आहे. परंतु या नियमाबद्दल सरकारने फेरविचार करावा याकरिता सिंटाचे उपाध्यक्ष मनोज जोशी यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

मोठी बातमी - UBER ने मुंबई ऑफिस केलं बंद, मात्र ग्राहकांना कंपनी म्हणतेय...

ज्येष्ठ कलाकारांची संख्या मोठी आहे आणि त्यातील बहुतेक कलाकार विविध मालिकांमध्ये काम करीत आहेत. त्या कलाकारांना वगळून चित्रीकरण करणे कठीण बाब आहे. निर्माते त्यांना बदलू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे विनंती करणारे पत्र अभिनेते व सिंटाचे उपाध्यक्ष मनोज जोशी यांनी राज्यपालांना दिले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनाही पाठविले आहे.

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

राज्यपालांच्या भेटीमध्ये मनोज जोशी यांनी सिंटा तसेच तिचा इतिहास व टीव्ही इंडस्ट्रीत सिंटा करीत असलेली कामगिरी तसेच विविध राबविलेले विविध उपक्रम याची माहिती राज्यपालांना दिली. सुमारे चाळीस मिनिटांची ही भेट झाली. राज्यपालांनी टीव्ही तसेच चित्रपटसृष्टीला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी दिले. याबाबत मनोज जोशी म्हणाले, की "माननीय राज्यपालांनी आमचा मुद्दा नीट ऐकून घेतला. ही 40 मिनिटांची बैठक होती. ते खूप सकारात्मक होते आणि ज्येष्ठ कलाकारांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आम्ही सिंटा कडून दिलेल्या पत्राचा त्यांनी स्वीकार केला."