Video: TV Shows व्यतिरिक्त भारती सिंग ‘बिझनेस वुमन’; लोकप्रिय मिनलर वॉटर फॅक्ट्रीची आहे मालकीण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharti Singh

Video: TV Shows व्यतिरिक्त भारती सिंग ‘बिझनेस वुमन’; लोकप्रिय मिनलर वॉटर फॅक्ट्रीची आहे मालकीण

Bharti Singh: कॉमेडी करत प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारती सिंगला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ओळखतात. तिच्या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. मात्र टीव्ही शो व्यतिरिक्त ही अभिनेत्री एका फॅक्ट्रीची मालकीण आहे हे फार कमी लोकांना माहितीये. होय! कॉमेडी शो व्यतिरिक्तही भारती साइड बिझनेसमधून बक्कळ पैसे कमावते.

भारती सिंगची आहे पाण्याची फॅक्ट्री

भारती सिंगने तिच्या नव्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच तिच्या फॅक्ट्रीचा उल्लेख केलाय. भारतीची ही फॅक्ट्री पंजाबमध्ये आहे. अनेकांना यावेळी ही फॅक्ट्री नेमकी कशाची आहे असा प्रश्न पडला असेल. तर ही फॅक्ट्री आहे पाण्याची. भारतीने तिच्या व्हिडिओमध्ये ही फॅक्ट्रीसुद्धा दाखवली आहे. मिनरल वॉटरची ही फॅक्ट्री अमृतसरच्या आऊटरला मोकळ्या जागेत असून त्या ठिकाणी एक छोटसं रेसॉर्टदेखील आहे. ही फॅक्ट्री तिने जवळपास ४-५ वर्षाआधी सुरू केली होती.

भारतीच्या मिनरल वॉटरच्या फॅक्ट्रीने आजुबाजुच्या गावातील लोकांना रोजगार मिळाला आहे. तिच्या मिनरल वॉटरच्या ब्रँडचं नाव आहे 'KELEBY'. भारती सिंगने प्रचंड संघर्षातून पुढे जात आज टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारती सिंगने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे सात मीलियन फॉलोवर्स झाल्याबाबतची एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या व्हिडिओखाली नेटकऱ्यांच्या कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव झालाय.

Web Title: Comedian Bharti Singh Revealed Her Side Business She Owns Mineral Water Company Named Keleby A Business Woman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..