
कॉमेडी किंग म्हणून वेगळी ओळख असणारा कलाकार म्हणून राजू श्रीवास्तव याचे नाव घ्यावे लागेल. पण त्याच्या सारख्या कलाकाराला जीवे मारण्याची धमकी का येते असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
मुंबई - आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना आपलेसे करणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव हा अष्टपैलू कलाकार आहे. तो सोशल मीडियावर चर्चेत राहणारा सेलिब्रिटी असून आता त्याला जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा फोन थेट पाकिस्तानातुन आला असल्याने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार उत्तरप्रदेशातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान माझ्यासाठी 'फरिश्ता': रेमो रिसुझा झाला भावनाशील
कॉमेडी किंग म्हणून वेगळी ओळख असणारा कलाकार म्हणून राजू श्रीवास्तव याचे नाव घ्यावे लागेल. पण त्याच्या सारख्या कलाकाराला जीवे मारण्याची धमकी का येते असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. त्याला थेट पाकिस्तान मधून एक व्हॉट्स अप कॉल आला होता. राजू श्रीवास्तवचा मुख्य सल्लागार अजित सक्सेनाकडे पाकिस्तानातील मोबाइल नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला होता. राजू आणि सक्सेना यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. व्हॉट्सअॅप कॉल करणाऱ्याने हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारींसारखी अवस्था करण्याची धमकी दिली होती. सक्सेना यांनी बर्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बिग बॉस ड्रामा: राखी सावंतने फाडले राहुलचे कपडे, 'हेच जर महिलेच्या बाबतीत...' अली गोनीचा सवाल
राजू श्रीवास्तवचा मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, 'सोमवारी व्हॉट्सअॅप कॉल आला. राजू श्रीवास्तवला समजावून सांग, पाकिस्तान आणि दाऊदबाबत चुकीचे बोलतो. लखनऊच्या कमलेश तिवारीसारखी अवस्था केली जाईल, अशी धमकी त्या व्यक्तीने दिली.' या प्रकरणी बर्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: नाट्यरसिकांसाठी नव्या वर्षात पर्वणी, 'या' कलाकृती पुन्हा रसिकांसाठी होणार सादर
या प्रकरणात उत्तर प्रदेशातील कानपूरमधील बर्रा पोलिसांनी जातीने लक्ष घालायचे ठरवले आहे. त्यांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना राजू श्रीवास्तव म्हणाला, 'जेव्हा भारतावर पाकिस्तान आणि चीनकडून हल्ला केला जातो, त्यावेळी मला प्रचंड राग आला होता. माझा राग कॉमेडीच्या माध्यमातून निघत असतो. शत्रूंना कॉमेडीतून टार्गेट करतो. मला धमकावले जात आहे. माझी अवस्था लखनऊच्या कमलेश तिवारींसारखी केली जाईल. माझ्या मुलांना मारले जाईल, पण मी माझ्या देशाबद्दलच बोलेन. मी माझ्या पद्धतीने काम करत आहे. माझ्या देशाचे जवान सर्जिकल स्ट्राइक करतात, तेव्हा आपल्याला आनंद झाल्याचेही राजुने यावेळी सांगितले.
मनोरंजन