
माझं जे पालनपोषण झालं त्यावेळी आमच्या परिवारात विसंवाद मोठ्या प्रमाणावर असल्याचे जाननं म्हटलं आहे. त्यानं मराठी भाषेविषयी केलेल्या एका विधानामुळेही तो वादाच्या भोव-यात सापडला होता.
मुंबई - प्रसिध्द गायक कुमार सानु यांचा मुलगा जान कुमार सानु यांच्यातील वाद काही लपुन राहिलेला नाही. जेव्हा जान बिग बॉसच्या स्पर्धेत सहभागी झाला तेव्हापासून त्यांच्यातील वाद समोर येण्यास सुरुवात झाली. तो वाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. कुमारनं तर जानचा सांभाळ करणा-या त्याच्या आईला याप्रकरणी दोष दिला होता. जानचं पालनपोषण हे खूपच लाडात झालं आहे. त्यामुळे तो त्याला वाट्टेल तसे बोलत असतो असे त्यानं म्हटलं होतं.
जाननं सोशल मीडियावर जी एक पोस्ट व्हायरल केली आहे त्यात त्यानं माझ्यात आणि कुमार सानु यांच्यात थोडा विसंवाद असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारचे विधान करुन त्यानं एकप्रकारे यापूर्वीच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. माझं जे पालनपोषण झालं त्यावेळी आमच्या परिवारात विसंवाद मोठ्या प्रमाणावर असल्याचे जाननं म्हटलं आहे. जान बिग बॉस या रियॅलिटी शो चा स्पर्धक होता. त्यानं मराठी भाषेविषयी केलेल्या एका विधानामुळेही तो वादाच्या भोव-यात सापडला होता.
ट्विंकलच्या वाढदिवशी अक्षयची 'खास' रोमँटिक पोस्ट
कुमार सानु यांनी त्यावेळी या प्रकरणात लक्ष घातल्यानं त्यावर पडदा पडला. त्यांनी जानची चांगलीच कानउघाडणी केली होती. मात्र ती करताना त्यांनी त्यांच्याच काही कौटूंबिक वादाची चर्चा सोशल मीडियावर केली होती. त्यावरुन या दोन्ही बापलेकांना प्रेक्षकांनी धारेवर धरले होते. जान तर काही राजकीय पक्षांच्या टीकेचा विषय ठरला होता. जानची आई आणि कुमार सानु यांच्यात काही कारणास्तव दुरावा आला होता. त्यामुळे ते गेल्या कित्येक वर्षांपासुन वेगळे राहत होते. जाननं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आमच्या परिवारात जरा कम्युनिकेशन गॅप आहे. आणि त्याचा परिणाम नात्यावर झाला आहे.
आणखी वाचा : 'कुणाला काही प्रॉब्लेम असल्यास मला अनफॉलो करा'
जान म्हणाला की, माझ्या वडिलांच्या माझ्याविषयी संमिश्र प्रकारच्या भावना आहेत. त्यांच्यासोबतचे काही हळवे प्रसंगही आहेत. मात्र दरवेळी एक दुरावा आमच्यात तयार होतो याचे महत्वाचे कारण म्हणजे आमच्यातील हरवलेला संवाद हे आहे. मला वडिलांशी फारशी बोलण्याची संधी काही मिळाली नाही. पण ज्यावेळी मिळाली त्यावेळी एक चांगल्या प्रकारचा संवाद आमच्यात झाला आहे हे सांगावे लागेल.
फॅमिली मॅन 2 चे पोस्टर व्हायरल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली
मला एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे वडिलांनी आईवर केलेली टीका. ज्याप्रकारे सोशल मीडियावर त्यांनी मायलेकांविषयी लिहिले त्यावरुन ते आमच्याबद्दल कशाप्रकारे विचार करतात हे सिध्द झाल्याचेही जान कुमार सानुने यावेळी सांगितले.