
कमल हासन विरोधात तक्रार; केंद्र सरकारचा अपमान केल्याचा आरोप,काय आहे प्रकरण?
दाक्षिणात्य सिनेमांचे सुपरस्टार कमल हासन(Kamal Haasan) यांचा सिनेमा 'विक्रम' ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील पहिलं गाणं 'पत्थला पत्थाला' नुकतंच रिलीज करण्यात आलं. कमल हासननं स्वतः या गाण्याला लिहिलं आहे,गायलं देखील आहे. या गाण्याला संगीत अनिरुद्ध रविचंदरननं दिलं आहे. आता हाती लागलेल्या बातमीनुसार कळत आहे की,कमल हासनच्या विरोधात त्याच्या 'पत्थला पत्था'ला' गाण्यासंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा: संजय-मान्यता दत्तमध्ये 'का रे दुरावा'; अभिनेत्यानेच केला खुलासा
एका सामाजिक कार्यकर्त्यानं दावा केला आहे की,'पत्थला,पत्थाला' गाण्याचे शब्द केंद्र सरकारची खिल्ली उडवत आहेत. आणि यामुळे लोकांमध्ये फूट पडणार आहे''. याकारणामुळे कमल हासनच्या विरोधात चेन्नई पोलिस आयुक्त कार्यालयात एक तक्रार दाखल केली गेली आहे,ज्या तक्रारीत सिनेमाच्या निर्मात्यांना गाण्यातील काही शब्द काढून टाकण्यास सूचित केलं गेलं आहे.
'पत्थला पत्थाला' गाण्याच्या ओळी काहीशा अशा आहेत,''गज्जनाले कासिले कल्लालैयुम कासिले कैचल जोरम नेरैया वरुधु थिल्ललंगाडी थिल्लाले ओन्ड्रियातिन थापले ओन्नियुम इल्ला इप्पले सावी इपो थिरुदन कैला थिल्लंगाडी थिल्लाले... ''ज्याला सामाजिक कार्यकर्ता सेल्वमने गाण्यातून काढण्यास सांगितले आहे. सेल्वमने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: कंगनाचं महेश बाबूला समर्थन; म्हणाली,'हे खरंय,तो बॉलीवूडला परवडणार नाही'
जर आपल्या तक्रारीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही तर 'विक्रम' सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केली जाईल,असंही तक्रारदारानं म्हटलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामुळे कमल हासनच्या गाण्याला मात्र चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हे गाणं ट्रेंडिगमध्ये आहे आणि त्याला आतापर्यंत १४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Web Title: Complaint Alleges Kamal Haasans New Song From Vikram Insults Union
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..