संजय-मान्यता दत्तमध्ये 'का रे दुरावा'; अभिनेत्यानेच केला खुलासा Sanjay Dutt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Dutt with wife Maanyata dutt

संजय-मान्यता दत्तमध्ये 'का रे दुरावा'; अभिनेत्यानेच केला खुलासा

संजय दत्त(Sanjay Dutt) नुकताच आपल्याला 'केजीएफ चॅप्टर २' या ब्लॉकबस्टर सिनेमात दिसला होता. सिनेमात भले त्याची भूमिका खलनायकाची होती,परंतु त्यानं साकारलेल्या त्या नकारात्मक भूमिकेनंही चाहत्यांचं मन जिंकलं बरं का. आता पुन्हा संजय 'पृथ्वीराज' सिनेमातनं आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. संजय सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे आणि या प्रमोशन दरम्यान संजयनं खुलासा केला आहे की,त्याची पत्नी मान्यता दत्त(Manyata Dutt) आणि मुलं शाहरान,उकरा त्याच्यापासून लांब दुबईत राहत आहेत. माहितीसाठी सांगतो की २०२० सालापासूनच मान्यता मुलांसोबत दुबईत शिफ्ट झाली आहे. आता संजयनं यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा: 'बलात्कार एक सरप्राइज सेक्स'; सनीला हे खळबळजनक ट्वीट करणं पडलं होतं महाग

संजय दत्त म्हणाला,''ते सगळे इकडे सुद्धा राहू शकतात,पण त्यांना दुबईत जास्त आवडतं. मुलांना दुबईतील त्यांची शाळा आणि तिथल्या अॅक्टिव्हिटीज खूप आवडतात. माझ्या पत्नीनं देखील दुबईत तिचा बिझनेस सेटल केला आहे. माझ्या कुटुंबाला दुबईत पाठवायचा माझा काही प्लॅन नव्हता. हा अचानक घेतलेला निर्णय आहे. मान्यता आधीपासूनच दुबईत तिचा बिझनेस करत होती,ती अचानक तिथे गेली आणि मग मुलं तिकडे गेली. आणि आता ते सगळे तिथेच राहतात''.

हेही वाचा: आमिरच्या मुलाची बॉलीवूड एन्ट्री; बाप-लेक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार

'संजय दत्तला बायको-मुलांची आठवण येत नाही का?' असं विचारल्यावर तो म्हणाला,''मी जेव्हा तिथून आलो तेव्हा मी त्यांना तिथे खूश पाहिलं. माझी मुलगी तिकडे पियानो शिकत आहे. तिला जिमनॅस्टिक देखील आवडतं. माझा मुलगा तिकडे ज्युनिअर फुटबॉल टीमसाठी खेळतो. त्यांच्या आनंदापेक्षा जास्त माझ्यासाठी काही नाही''.

हेही वाचा: कंगनाचं महेश बाबूला समर्थन; म्हणाली,'हे खरंय,तो बॉलीवूडला परवडणार नाही'

'केजीएफ चॅप्टर २' प्रदर्शित झाल्यानंतर मान्यता दत्तने संजयची प्रशंसा करताना केलेली पोस्ट भलतीच व्हायरल झाली होती. मान्यतानं तेव्हा सांगितलं होतं की,''या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानं संजय दत्त कॅन्सरशी झुंज देत होता. हा सिनेमा आमच्यासाठी कायम खास राहिल. जे लोक माझ्या पतीला गैरजबाबदार ठरवतात किंवा वाईट माणूस म्हणतात,त्यांनी हा सिनेमा पहायला हवा. सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत,त्याप्रतीची त्याची जबाबदारी,एकनिष्ठता स्पष्ट दिसून येईल. आणि त्यानं तेव्हा हे सगळं केलं जेव्हा आम्ही खूप कठीण प्रसंगातून जात होतो. कॅन्सरमुळे सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांशी कडवी झुंज देत त्याने खूप शानदार काम केलं आहे,कठीण सीन शूट केले आहेत. माझ्यासाठी तोच सिनेमाचा हिरो आहे''.

Web Title: Wife Manyata Dutt Has Been Living In Dubai Separately From Sanjay Dutt For Two Years Sanju Baba Has Now

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top