
कंगनाचं महेश बाबूला समर्थन; म्हणाली,'हे खरंय,तो बॉलीवूडला परवडणार नाही'
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने(Mahesh Babu) बॉलीवूड(Bollywood) संदर्भात जे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं त्यामुळे त्याची चर्चा तर झालीच पण हळूहळू त्याला वादाचा रंग देखील चढत गेला. महेश बाबूच्या 'बॉलीवूडला मी परवडणार नाही' या वक्तव्यानंतर हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या. पण आता सगळे बॉलीवूडकर महेश बाबू विरोधात बोलले म्हटल्यावर कंगना(Kangana Ranaut)पुढे सरसावलीच पाहिजे नाही का. कंगनानं अपेक्षा होती त्याप्रमाणेच केलं आहे. म्हणजे तिनं महेश बाबूला समर्थन करीत बॉलीवूडला खडे बोल सुनावण्याची संधी वाया जाऊ दिली नाही. कंगना म्हणाली,''महेश बाबू जे काही म्हणाला,ते खरं आहे. बॉलीवूडला तो परवडणार नाही''. याचसोबत कंगनानं तेलुगू सिनेइंडस्ट्रीची खूप प्रशंसा देखील केली. कंगनानं 'धाकड'(Dhaakad) सिनेमाच्या ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमात महेश बाबूच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Kangana Ranaut Latest News in Marathi)
हेही वाचा: 'त्यादिवशी माझा वाढदिवस होता,अख्खं ठाणं जळत होतं'; हेमांगीची पोस्ट चर्चेत
महेश बाबूनं त्याचा आगामी सिनेमा 'सरकारू वारी पाटा' च्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूड संदर्भात ते वक्तव्य केलं होतं. अर्थात तो हिंदी सिनेमात काम कधी करणार याविषयी त्याला प्रश्न विचारला गेला होता. त्यावर महेश बाबू म्हणाला होता,''मला माहित नाही मी जे आता बोलेते कदाचित तुम्हाला वाटेल मी अहंकारी आहे. पण मला हिंदीमधनं खूप ऑफर्स येतात,पण साधी गोष्ट आहे की बॉलीवूडला मी परवडत नाही. आणि मग असं आहे तर मी माझा वेळ तिथे का वाया घालवू. मला दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत खूप छान वागणूक मिळते,सम्मान मिळतो, त्यामुळे मी ही इंडस्ट्री सोडून बॉलीवूडमध्ये जाण्याचा विचार करु शकत नाही''.
हेही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्यावर बायोपिक? 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...
कंगनाच्या 'धाकड' सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान जेव्हा तिला महेश बाबूच्या बॉलीवूडवरील वक्तव्याविषयी विचारलं गेलं तेव्हा तिनं दुसऱ्या सेकंदाला महेश बाबूचं समर्थन केलं. ती म्हणाली,''महेश बाबू जे म्हणाला ते अगदी योग्य आहे. मला माहित आहे कि त्यांना बॉलीवूडच्या कितीतरी निर्मात्या-दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमाच्या ऑफर्स दिल्या होत्या. त्यांच्या पिढीतल्या अभिनेत्यांनी तेलुगु सिनेइंडस्ट्रीला भारतात नंबर वन फिल्म इंडस्ट्रीचा दर्जा मिळवून दिला आहे''. कंगनानं यावेळी महेश बाबूसोबतच तेलुगू सिनेइंडस्ट्रीवर स्तुतीसुमन देखील उधळली.
हेही वाचा: ऑडिशन टेपमध्ये कार्तिकला 'त्या' अवस्थेत पाहून आईला बसला होता धक्का
कंगना पुढे म्हणाली,''महेश बाबूनं आपल्या सिनेइंडस्ट्रीचा सम्मान केला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. तेलुगु इंडस्ट्रीला आयतं काहीच मिळालेलं नाही,त्यांनी जे काही करुन दाखवलं आहे ते गेल्या १०-१५ वर्षाच्या कठीण परिश्रमांचं फळ आहे. इतकंच नाही तर तेलुगुनं यामुळे तामिळ सिनेइंडस्ट्रीला देखील मागे टाकलं आहे. हे आपण खरं तर त्यांच्याकडून शिकायला हवं''.
हेही वाचा: अंधश्रद्धाळू कियारा; एखादा सिनेमा साइन करेपर्यंत 'ही' गोष्ट मूळीच करत नाही
बॉलीवूड संदर्भातील आपल्या वक्तव्यावरुन वाद रंगतोय हे लक्षात आल्यावर महेश बाबूनं पुन्हा यावर स्पष्टिकरण देताना म्हटलं होतं,''मी फक्त माझ्या इंडस्ट्रीप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला होता''. महेश बाबू म्हणाला,''मला नेहमी तेलुगु सिनेमातनं काम करण्याची इच्छा आहे आणि मला वाटतं माझ्या तेलुगु सिनेमांनी देशभरात चांगला परफॉर्मन्स द्यावा. मला नेहमी वाटतं की आपण आपल्या इंडस्ट्रीला सोडून दुसऱ्या इंडस्ट्रीत का जावं? मला खूप आनंद आहे की आमचे सिनेमे नॉर्थ मध्ये देखील पोहोचत आहेत. आमचे सिनेमे पॅन इंडिया लेवलवर खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. आणि माझं स्वप्न पूर्ण होत आहे''.
हेही वाचा: शिल्पा शेट्टीचं काय बिनसलं? सोशल मीडियावर केली मोठी घोषणा
महेश बाबूच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर कंगनानं हिंदी राष्ट्रिय भाषा वादावर देखील बोलणं पसंत केलं. ती म्हणाली,''देशात खूप भाषा आहेत,आणि कोणतीच भाषा कमी दर्जाची नाही. त्यामुळे प्रत्येक भाषेचा सारखाच सम्मान करायला हवा. जेव्हा आपण दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा तिथली भाषा देखील आपण शिकायला हवी. मी स्वतः हिमाचल प्रदेशची आहे,पण मुंबईत कामानिमित्तानं रहायला लागल्यावर मी मराठी भाषा शिकले''.
हेही वाचा: 'उर्मिला आणि माझ्यात...'; बिनसलेल्या नात्यावर काय म्हणाला आदिनाथ कोठारे?
कंगनाचा 'धाकड' सिनेमा २० मे ,२०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अर्जुन रामपाल,दिव्या दत्ता देखील कंगना सोबत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
Web Title: Kangana Ranaut Reacts On Mahesh Babu Statement About
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..