कसौटीमधील कलाकारांच्या कोरोना टेस्टबाबत आली महत्वाची बातमी; आमना शरीफचा एक कर्मचारी पाॅझिटिव्ह

kasauti
kasauti

मुंबई :  स्टार प्लसवरील कसौटी जिंदगी की या मालिकेतील मधील अभिनेता पार्थ समथानची कोरोना  चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या मालिकेच्या सेटवर तणावाचे वातावरण होते. 

जेव्हा अहवाल आला तेव्हा सेटवर सुमारे तीस जण उपस्थित होते. त्यानंतर प्रत्येकाची कोरोना टेस्ट केली गेली. दरम्यान, अशी अफवा पसरली होती की पार्थची को-स्टार एरिका फर्नांडिसही पॉझिटिव्ह आहे. मात्र तसे काहीच नाही. बुधवारी सकाळी एरिकाचा अहवाल आला आहे. ज्यामध्ये ती निगेटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आमना शरीफ पार्थबरोबर शुटिंग करत होती. त्यानंतर तिचा स्टाफ आणि कुटुंबीयांची चाचणी करण्यात आली. सुदैवाने, आमना आणि तिच्या कुटुंबाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र आमनाच्या कर्मचार्‍यांपैकी एकास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. 

आमनाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. यासोबतच सुरक्षित राहण्याचे आवाहन करत त्यांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.

पार्थ संक्रमित झाल्यानंतर सर्व कर्मचारी आणि कलाकारांच्या सदस्यांची कोरोना चाचणी झाली. त्यापैकी एरिका फर्नांडिस, आमना शरीफ, करण पटेल, शुभावी चौकसे आणि पूजा बॅनर्जी यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे. नुकतेच या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले होते आणि आता ते कधी सुरू होईल हे सांगता येत नाही.

संपादन : अथर्व महांकाळ 

corona test of kasauti actors negative 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com