
देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असताना सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटीही घरात कैद आहेत. मात्र, हे सेलिब्रिटी व्हिडिओ व्हायरल करून
सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आहेत. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही रोमान्सचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.
मुंबई : देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असताना सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटीही घरात कैद आहेत. मात्र, हे सेलिब्रिटी व्हिडिओ व्हायरल करून
सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आहेत. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही रोमान्सचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.
Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...
कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटचे सामने रद्द झाल्यामुळे विराट सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. विराटसाठी अनुष्का चक्क हेअरस्टायलिस्ट झाली आहे. याचा व्हिडिओ अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटचे केस कापताना दिसत आहे. अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये विराट, क्वारंटाईनमध्ये तुम्हाला काय करावे लागते बघा, असे बोलत आहे. यावर अनुष्का, स्वयंपाकघरातल्या कात्रीने केस कापणे, या अशा गोष्टी आवडतात, असे उत्तर विराटला दिले. अखेर शरणागती पत्करत विराट शेवटी. माझ्या बायकोने सुंदर केस कापले आहेत, असेही म्हणताना दिसत आहे.
दरम्यान, यापूर्वी विराट आणि अनुष्काने कोरोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. पण, नेटिझन्स सध्या विराटवर टीका करताना दिसत आहेत. कारण, त्याने अद्याप कोरोनाग्रस्तांना मदत जाहीर केलेली नाही.