कोरोनाबाधित करीना कपूरला कुटुंबाची आठवण, सोहा अली खानच्या पोस्टवर लिहिले

कोरोनाबाधित करीना कपूरला कुटुंबाची आठवण, सोहा अली खानच्या पोस्टवर लिहिले

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) कोरोनाची लागण झाल्यापासून सध्या क्वारंटाईनमध्ये (quarantine) आहे. अशा परिस्थितीत ती कुटुंबापासून दूर राहून दिवस काढत आहे. नुकताच अभिनेत्रीचा मोठा मुलगा तैमूरचा (Taimur Ali Khan) वाढदिवस साजरा करण्यात आला.

पण, अभिनेत्री या खास प्रसंगी तिच्या कुटुंबात सामील होऊ शकली नाही. यावेळी त्याची बहीण सारा अली खान (Sara Ali Khan) आणि वडील सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी तैमूरचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. या सेलिब्रेशननंतर अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर (instagram) त्याची काही छायाचित्रेही शेअर केली आहेत.

याशिवाय करीना कपूरची वहिनी आणि अभिनेत्री सोहा आला खान (Soha Ali Khan) हिनेही एक पोस्ट शेअर केली आणि तैमूरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये सोहाने तैमूरला पहिल्यांदा आपल्या मांडीवर कधी घेतले ते फोटो शेअर केले होते. यासोबतच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तैमूर त्याची बहीण इनायासोबत (Inaya) खेळताना दिसत आहे.

त्याचवेळी, सोहाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना करीनाने लिहिले की, “आम्ही सर्वजण तुला खूप मिस करत आहोत आणि लवकरच भेटू. खरंतर, करीना कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून आयसोलेशनमध्ये (isolation) आहे. करिनाची दोन मुलं तैमूर आणि जेह तिच्यासोबत आहेत. अभिनेत्रीचे वडील अभिनेते रणधीर कपूर (Randheer kapoor) यांनी ही माहिती दिली.

कोरोनाबाधित करीना कपूरला कुटुंबाची आठवण, सोहा अली खानच्या पोस्टवर लिहिले
सलमानच्या शर्टलेस फोटोवर घायाळ होऊन तिनं अशी काही कमेंट केली की...

करीनाने पुढे लिहिले की, माझ्या मुला, हा तुझा पहिला आणि शेवटचा चढ उतार नाही; यापुढे ही असे अनेक येतील. पण मला एक गोष्ट चांगली माहीत आहे की तू नेहमी स्वत:ला वर घेशील, मोठी पावलं उचलशील आणि डोकं उंच करून पुढे चालशील, कारण तू माझा सिंह आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा हार्टथ्रॉब (Heartbeat)… माझ्या मुलासारखा कोणीही नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com