सलमानच्या शर्टलेस फोटोवर घायाळ होऊन तिनं अशी काही कमेंट केली की...

ती अभिनेत्री आहे त्याची एकेकाळची गर्लफ्रेंड...
Salman Khan
Salman KhanGoogle

सलमान खानच्या(Salman Khan) पिळदार शरीरयष्टीच्या प्रेमात फक्त मुलीच नाहीत तर मुलंसुध्दा आहेत बरं का. एक काळ होता की त्यानं मुलांना सिक्स पॅक अॅब्ज म्हणजे काय आणि त्यासाठी काय मेहनत घ्यायची याचे एकप्रकारे धडेच दिले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'ओ,ओ जाने जाना,ढुंढे तुझे दिवाना' हे गाणे म्हणताना आपली पिळदार बॉडी दाखवण्यासाठी शर्टलेस होऊन नाचणारा सलमान कुणाला आठवणार नाही. तेव्हापासून अनेक जणींच्या स्वप्नातला राजकुमार म्हणून जे स्थान त्यानं पटकावलंय ते आजतागायत कायम आहे. आजही त्याच्यात ती तशीच पूर्वीची धमक पहायला मिळते. यामागे फक्त त्याचे कष्ट आहेत. म्हणजे आता साठीच्या दिशेने प्रवास करणारा सलमान स्वतःच्या लूकबाबत किती जागरूक आहे हे यावरनं स्पष्ट होतं.

Salman Khan
लग्नानंतर अंकिता लोखंडेचा नवीन घरात असा झाला गृहप्रवेश...

नुकताच सलमानने जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता तो फोटो पाहून कोण म्हणेल ह्या फोटोत दिसणारा माणूस ५५वर्षांचा आहे. त्या फोटोत सलमाननं त्याच्या डोक्यात बिईंग ह्युमनची कॅप घातली आहे. आणि त्या फोटोला त्यानं कॅप्शन देत लोकांना विचारलंय की,''मी डोक्यात घातलेली बिईंग ह्कॅयुमनची ही कॅप तुम्हाला आवडली का?'' आता निश्चितच शर्टलेस होऊन कुणी उगाचच डोक्यातल्या कॅपविषयी तर नक्कीच विचारणार नाही. त्यालाही आपली पिळदार बॉडीच लोकांना दाखवायची होती पण त्यानं थोडंस वेगळ्या स्टाईलने लोकांना हे विचारलं एवढंच,नाहीतर सरळ बोलेल तो सलमान कुठला.

Salman Khan
सोनाली कुलकर्णीनं सादर केलं कपाटातल्या साड्यांचं कलेक्शन;व्हिडीओ पहा
Salman Khan, Sangeeta Bijlani
Salman Khan, Sangeeta BijlaniGoogle

त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय. कुणी म्हटलंय,'भाई तुमच्या बॉडीवरनं नजर हटेल तर आम्ही डोक्यातली कॅप पाहू ना'. तर कुणी म्हटलंय,'ईस्ट हो या वेस्ट,भाई की बॉडी इज बेस्ट,और भाई की टोपी इज बेस्ट'.या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही इथे दिलेल्या आहेत. पण या सर्व चाहत्यांसोबतच आणखी एक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ती सलमानच्या एक्स-गर्लफ्रेंडने दिली आहे. तर ती त्याची एक्स आहे संगीता बिजलानी. संगीतानं सलमानच्या शर्टलेस फोटोवर 'फायर इमोजी' कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केल्याने सध्या एकच चर्चा होतेय. आता संगीताही सिंगल आहे आणि भाई सलमानही. त्यात दोघांंचं एकेकाळी एकमेकांवर प्रेम होतं. ते लग्नही करणार होते असं एकदा सलमानच 'कॉफी विथ करण' मध्ये बोलला होता. त्यामुळे पुन्हा बिछडे दिल मिळणार का असा सुर उमटतोय. असो,आता सलमानचे चाहते म्हणून आपल्याला ही आशा मनात बाळगायला काय हरकत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com