अभिनेता सुमीत राघवनने केलं 'योगी आदित्यनाथ' यांचं कौतुक, कारणही आहे तसंच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sumeet raghvan on yogi adityanath

अभिनेता सुमीत राघवनने केलं 'योगी आदित्यनाथ' यांचं कौतुक, कारणही आहे तसंच..

Sumeet raghvan : मराठीसह हिंदी मध्ये आपल्या अभिनयाची मोहन उमटवणारा अभिनेता सुमीत राघवन सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. मराठी भाषेचा मुद्दा असो कलाकारांचे प्रश्न किंवा एखादी राजकीय- सामाजिक घडामोड... त्यावर अत्यंत पोटतिडकीने तो आपले विचार मांडत असतो. महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती याबाबत त्याला विशेष प्रेम आणि आस्था आहे. पण यंदा त्याने चक्क उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांचे कौतुक केले आहे. त्याने योगीजींचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

(sumeet raghvan on yogi adityanath)

हेही वाचा: 'रानबाजार'साठी माधुरी पवारने केलं टक्कल.. भलतीच गाजतेय भूमिका...

या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ रस्त्यांच्या समस्यांबाबत बोलत आहेत. सध्या रस्त्यावरील समस्या ही गंभीर बाब असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. योगी आदित्यनाथ यांनी त्याची दखल घेतली असून नवे नियम लागू केले आहेत. याच संदर्भातील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत आदित्यनाथ म्हणतात,'रस्त्याच्या बाजूला कोणतीच वाहनं उभी करू नयेत. हायवेला तर कित्येक ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवण्यात येतात. पण असं का होतं? यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. नियमित पेट्रोलिंग करा. अन्यथा गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करा. एखाद्या ढाब्यावर देखील पार्किंगसाठी जागा नसेल तर अशा ढाब्यांवर कारवाई करा.' याशिवाय अवैध पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या बस, रिक्षा, गाड्या, प्रवाशांची सुरक्षा यावरही ते बोलले आहेत. (actor sumeet raghvan tweet yogi adityanath video about road and illegal parking)

या महत्वाच्या विषयाला हात घातल्याने सुमीतन ट्विट करत योगीजींचे कौतुक केले आहे. सुमीत म्हणतो, 'रस्ते, स्पीड ब्रेकर, रोड माफियांबाबत बोलताना एखाद्या राज्याच्या प्रमुखाला मी पहिल्यांदाच पाहतोय किंवा ऐकतोय. त्यांचा हेतू नेमका काय आहे हे योगी आदित्यनाथ यांच्या डोळ्यांमधून आणि आवाजामधून स्पष्ट होतं. कोणतीच वायफळ बडबड नाही. शब्दांचा खेळ नाही. योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम.' सुमीतचं हे ट्विट सध्या बरेच चर्चेत आले आहे. त्याच्या ट्विटवर सध्या अनेकजण आपले मत व्यक्त करत आहेत.

Web Title: Actor Sumeet Raghvan Tweet Yogi Adityanath Video About Road And Illegal Parking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top