esakal | मराठमोळ्या सायलीच्या अदांवर CSKचा क्रिकेटर फिदा, म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Sayali Sanjeev

मराठमोळ्या सायलीच्या अदांवर CSKचा क्रिकेटर फिदा, म्हणाला...

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठी इंडस्ट्रीत अल्पावधीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून सायली संजीव Sayali Sanjeev ओळखली जाते. 'काहे दिया परदेस' Kahe Diya Pardes या लोकप्रिय मालिकेतून सायली घराघरांत पोहोचली. तिने 'मन फकिरा', 'आटपाडी नाईट्स', 'एबीसीडी', 'बस्ता', 'सातारचा सलमान' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. सोशल मीडियावरही तिच्या फॅन फॉलोइंगची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये आता सेलिब्रिटींचाही समावेश होत आहे. सायलीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर स्वत:चा फोटो शेअर केला. तिच्या या फोटोवर चेन्नई सुपर किंग्ज CSK या क्रिकेट टिममधला क्रिकेटर ऋतुराज गायकवाड Ruturaj Gaikwad याने कमेंट केली आहे. ऋतुराजच्या या कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. (csk player ruturaj gaikwad commented on marathi actress sayali sanjeev photo)

सायलीने सेटवरील फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने राखाडी रंगाचा पोलका डॉट डिझाइनचा हाय स्लीट वन पीस परिधान केला आहे. वन आणि त्यावर पांढरे शूज असा तिचा कूल लूक आहे. तिच्या या फोटोला ६० हजारांहून लाइक्स मिळाले आहेत. याच फोटोवर ऋतुराजने 'Woahh' अशी कमेंट करत हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. ऋतुराजच्या या कमेंटवर सायलीनेही हृदयाचे इमोजी पोस्ट केले.

हेही वाचा : 'आई कुठे काय करते' मालिकेतील 'यश'ची पत्नी आहे 'पानिपत'मधील ही अभिनेत्री

सध्या आयपीएलमध्ये ऋतुराज चांगलाच चर्चेत आहे. "पुढील एक दोन वर्षे तो याच लयीत खेळत राहिला तर महेंद्रसिंह धोनीच्या जागी तोच चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी दिसेल," अशा शब्दांत विरेंद्र सेहवागने त्याचं कौतुक केलं होतं. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार इनिंग करुन ऋतुराज लक्षवेधी ठरला होता. चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात फाफ ड्युप्लेसीससोबत ऋतुराज गायकवाडने मोलाची कामगिरी बजावली होती.

loading image