'कप साँग गर्ल' मिथिलाचं बर्थ डे सेलिब्रेशन पाहिलयं ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिध्द चेहरा म्हणजे मिथिला पालकर. आज तिचा २८ वा वाढदिवस असून फॅन्सने व सेलिब्रिटींने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिध्द चेहरा म्हणजे मिथिला पालकर. आज तिचा २८ वा वाढदिवस असून फॅन्सने व सेलिब्रिटींने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

वाढदिवसानिमित्त मिथिलाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हातात फुलांचा गुच्छ घेऊन फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला तिने ' पूर्ण हृदय भरून प्रेम, कृतज्ञता आणि केक, असे कॅप्शन दिले. ते ही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिथिलाचा इंस्टावर असणारा फॉलोअर्स मोठा आहे. ती गेल्या अनेक मालिका आणि चित्रपटांतून लोकप्रिय झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिद्धार्थ मेनन, प्रिया बापट ,कुब्रा सेठ,अमेय सिद्धार्थ मेनन, प्रिया बापट ,कुब्रा सेठ,अमेय वाघ इत्यादी सेलिब्रिटिंनी मिथिला पालकरला वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या. गेल्या काही वर्षांपूर्वींच्या मिथिलाच्या  'ही चाल तूरू तूरू' ह्या गाण्यावरच्या यूट्यूब व्हिडिओला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्या गाण्यानेच मिथिलाला एक नवी ओळख मिळाली होती. तसेच सेलिब्रिटी युट्युबर मोस्टली सेन म्हणजेच प्राजक्ता कोळी व बियुनिक म्हणून ओळखला जाणारा निकुंज लोटिया यांनीही मिथिलाला शुभेच्या दिल्या.

'चार हजार रुपये पगार होता, बाघाचं एका एपिसोडसाठीचं मानधन माहितीये ?'

टेडेक्स टॉक,वेब सिरीयस, यु ट्यूब व्हिडिओ, वेब शो, स्टॅन्ड उप कॉमेडी इत्यादींमुळे मिथिला नेहमीच चर्चेत असते.गर्ल इन द सिटी ह्या वेब सीरिजच्या माध्यमातून तिला प्रसिद्धी मिळाली तसेच तिच्या लिटल थिंग्स ह्या नेटफ्लिक्सच्या वेब सिरीजला ही प्रेक्षकांची पसंती मिळाली. मिथिलाने  तिच्या अभिनयाची सुरुवात २०१४ मध्ये मराठी शॉर्ट फिल्म 'माझा हनी मून' मधून केली. या शॉर्ट फिल्म ला १६ व्या मुंबई फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर मिथिलाच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली.

टी 20 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ? अन् 12 लाख गेले

हिंदी चित्रपट कट्टी बट्टी मध्ये मिथिलानं इमरान खानच्या बहिणीची भूमिका केली होती. तसेच अनेक जाहिरातींमध्येही ती मिथिलानं काम केले आहे.चॉपस्टिक, कारवा या हिंदी चित्रपटांमध्ये मिथिलाने काम केले आहे तसेच मराठी चित्रपट मुरांबा मधील अभिनयाने मिथिलाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या चित्रपटात तिनं अमेय वाघच्या प्रेयसीची भूमिका केली होती. नेटफ्लिक्सच्या येणाऱ्या त्रिभंग, तेढी मेढी क्रेझी या फिल्ममध्ये काजोलसोबत मिथिला दिसणार आहे. त्रिभंग चित्रपटामध्ये मिथिला काजोलच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cup Song Girl watched Mithila Palkar birthday celebration