अन् जयाप्रदांनी दलीप ताहिल यांच्या सणसणीत कानाखाली मारली.., अनेक वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा Dalip tahil opens up on viral rape scene with jaya prada | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dalip tahil opens up on viral rape scene with jaya prada

Bollywood: अन् जयाप्रदांनी दलीप ताहिल यांच्या सणसणीत कानाखाली मारली.., अनेक वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा

Bollywood: दलीप ताहिल बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. कितीतरी सिनेमातून त्यांनी खलनायकाच्या व्यक्तीरेखा साकारुन लोकांना घाम फोडला आहे तर कधी विनोदी व्यक्तिरेखा साकारुन सर्वांना हसवलं देखील आहे. दलीप ताहिल यांच्याशी जोडलेली एक बातमी अनेकदा चर्चेत आलेली आहे. बातमी होती की जया प्रदा यांच्यासोबत एक रेप सीन करताना दलीप ताहिल यांचा पाय घसरला अन् त्यामुळे अभिनेत्रीनं त्यांच्या श्रीमुखात लगावली गेली होती.(Dalip tahil opens up on viral rape scene with jaya pradaः

हेही वाचा: Drishyam 2 Cast Fees: अक्षयनं वसूल केले २.५ करोड तर अजय आणि तब्बूच्या मानधनाचा आकडा भलामोठा

दलीप ताहिल यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्वतःशी जोडल्या गेलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यांनी सांगितलं, ''मी खूप वर्षांपासून माझ्याविषयी पसरलेली एक बातमी वाचत आलो आहे की मी जयाप्रदा सोबत रेप सीन केला होता. त्यामध्ये लिहिलं होतं की तो सीन करताना माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं होतं. आणि जयाप्रदानं मला कानाखाली मारली होती''.

''गुगल अलर्टला ही बातमी अनेकदा येत असते. मी ही गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो की मी जयाप्रदा सोबत कधीच काम केलं नाही. मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं पण कधी संधीच मिळाली नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यानं कुणी माझ्याविषयी ही बातमी पसरवलीय त्या व्यक्तीनं मला तो सीन दाखवावा''.

हेही वाचा: Bollywood:अनुष्का-विराटचा बदलला मुंबईतील पत्ता; आता 'या' ठिकणी राहणार भाड्याने, महिन्याचं भाडं ऐकाल तर..

दलीप ताहिल यांनी पुढे सांगितलं की लोक आता स्वतः एखादी गोष्ट निर्माण करतात,जे कधी घडलंच नाहीय. विचार करा असं काही झालंच नाहीय ज्याची बातमी पसरली गेलीय तर कसं वाटेल तुम्हाला? दलीप ताहिल यांनी या मुलाखतीत आपल्या एका व्हायरल झालेल्या मजेदार सीनवर देखील भाष्य केलं. हा व्हिडीओ 'अजनबी' सिनेमातील आहे. यामध्ये दलीप ताहिल पोट दुखेपर्यंत हसलेयत. दिग्दर्शकाच्या सांगण्यावरनं वाटत नसतानाही असं पोट दुखेपर्यंत हसायला लागतं तेव्हा त्याचं दुःख केवळ कलाकारालाचा माहित असतं असंही दलीप ताहिल म्हणाले.