तर सुपरहिट 'बाजीगर'मध्ये शाहरुख खान हिरो म्हणून दिसलाच नसता..30 वर्षांनी झाला खुलासाShah Rukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan

Shah Rukh Khan: तर सुपरहिट 'बाजीगर'मध्ये शाहरुख खान हिरो म्हणून दिसलाच नसता..30 वर्षांनी झाला खुलासा

Shahrukh Khan: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यशाच्या ज्या शिखरावर पोहोचलाय तिथं पोहोचणं सगळ्यांनाच जमत नाही. त्याच्या 'पठाण' सिनेमाविषयी बोलायचं झालं तर त्या सिनेमानं सुपरस्टारच्या करियरला जीवनदान दिलं आहे. सोबतच बॉक्सऑफिसवर डळमळणाऱ्या बॉलीवूडला देखील मोठा आधार दिला आहे.

पण आजपासून जवळपास ३ दशकं आधी एक सिनेमा आला होता जो शाहरुखच्या करिअरमध्ये यशाची पहिली पायरी ठरला होता. पण तुम्हाला माहित आहे का शाहरुख या सिनेमात कामच करणार नव्हता. पण त्याच्या नशीबानं त्याला तो सिनेमा मिळाला आणि त्याचे तारेच चमकले.

अभिनेता दिपक तिजोरीनं याचा नुकताच खुलासा केला आहे.(Deepak Tijori reveals who was the first choice of abbas Mustan for Baazigar)

किस्सा असा आहे की 'खिलाडी' सिनेमात दीपक तिजोरीनं अब्बास मस्तानसोबत काम केलं होतं. या सिनेमात तो सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत होता. हा तो काळ होता जेव्हा दीपकने बऱ्यापैकी सगळ्यात बड्या सिनेमांमधून सेकंड लीड रोल साकारले होते.

या सिनेमात देखील असंच काहीसं होतं. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दीपक तिजोरीनं हॉलीवूड सिनेमा 'अ किस बिफोर डाइंग' चं नाव अब्बास मस्तानला सजेस्ट केलं होतं. या दरम्यानच ठरलं की या हॉलीवूड सिनेमाचा हिंदी रिमेक बनवला जाईल.

आणि यात दीपक तिजोरीला कास्ट केलं जाईल.

दीपक तिजोरी पुढे म्हणाला की, त्यानं ही गोष्ट पहलाज निहलानीला देखील सांगितली होती आणि त्याला देखील कल्पना आवडली होती. पण नंतर काय ट्वीस्ट आला ज्याविषयी कोणालाच कळले नाही.

सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी अब्बास मस्ताननं दीपक तिजोरी ऐवजी शाहरुख खानला पसंती दिली आणि दीपकला नुकसानभरपाई देऊ असं देखील सांगितलं. ते दीपकला घेऊन दुसरा सिनेमा बनवतील असं देखील सांगण्यात आलं.

यादरम्यान दीपक तिजोरीला एक गोष्ट मात्र नक्की कळली की बॉलीवूडमध्ये नुकसानभरपाई हा एक प्रचलित शब्द आहे,ज्याचा वास्तविक जीवनाशी दूर-दूरपर्यंत संबंध नाही.

'बाजीगर' सिनेमाविषयी बोलायचं झालं तर शाहरुख खानने निगेटि्व्ह भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला खूप पसंतही केलं होतं. आणि या सिनेमानंतरच त्याच्यातील अभिनयकौशल्याला खरी ओळख मिळाली.

'बाजीगर'मध्ये शाहरुखसोबत काजोल आणि शिल्पा शेट्टी देखील होत्या. 'बाजीगर' आजही लोकांच्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे.