
Sakal exclusive : हेमंत ढोमेने उडवली पालिकेची झोप, म्हणाला किशोरीताई..
Hemant dhome : विनोदी अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक हेमंत ढोमे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हेमंतच्या झिम्मा (jhimma) चित्रपटाने करोनानंतर मराठी चित्रपट सृष्टीला चालना मिळाली. या चित्रपटावर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केल. सात बायकांचा हा चित्रपट प्रेक्षकांना भरपूर आनंद देऊन गेला. बाई मनाच्या या विविध तरल बाजू समोर आणणारा हा दिग्दर्शक खऱ्या आयुष्यातही तितकाच संवेदनशील आहे.
हेही वाचा: खूप लवकर गेलात काका.. या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
काही दिवसांपूर्वीच त्याने राज ठाकरेंच्या भाषणावर आक्षेप नोंदवणारे ट्विट केले होते. शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली या वादावर महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो त्याने शेअर केला होता. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यंदा तर त्याने थेट मुंबई महापालिकेची झोप उडवली आहे. केवळ मुंबई महापालिकेचीच नाही तर थेट आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत त्याच्या समस्येची झळ पोहोचली आहे.
हेही वाचा: Photo: अबब !.. सोनाली कुलकर्णीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल..
हेमंत ढोमे हा मुंबई गोरेगाव पूर्व येथील एका गृहनिर्माण संस्थेत राहतो. या विभागात पाण्याची मोठी समस्या आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही वेळेत मिळत नाही. अनेकदा पालिकेत तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने अखेर हेमंत ढोमे याने थेट ट्विटरवरच महापालिकेला (mumbai bmc) लक्ष्य केले. 'बिल्डर आणि महानगरपालिकेच्या वादात प्रामाणिकपणे सर्व नियम पाळणारे, टॅक्स भरणारे सामान्य नागरिक भरडले जात आहे. पाणी मिळावे ही आमची माफक अपेक्षा आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती!' असे ट्विट करून त्याने पालिका, महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) , आयुक्त इकबालसिंह चहल (iqbalsingh chahal), पालकमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना टॅग केले. (water crisis in goregaon east)
पुढे त्याने इमारतीच्या ओसी प्रमाणपत्राचे आणि मालमत्ता कर भरल्याचे फोटोही ट्विट केले. सोबतच 'पाणी हा आमचा हक्क आहे! आम्हाला पाणी मिळायलाच हवं. बिल्डर आणि महानगरपालीकेच्या वादात आम्ही भरडले जातोय! असे कॅप्शन त्याने दिले. सोबत किशोरी ताई काहीतरी दखल घ्या. संपर्क साधा याबाबत आग्रहही धरला. अखेर पालिकेला दखल घ्यावीच लागली.
या ट्विटनंतर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने हेमंत ढोमे यांच्याशी संपर्क साधला आणि पाणी प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर हेमंतने पालिकेचे आभार मानणारे ट्विट केले. ''बरोबर २४ तासात आमच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लाऊन आपली कार्यतत्परता सिद्ध केल्या बद्दल @mybmc चे आभार. वैयक्तिक लक्ष घालुन माझ्या गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सभासदांची आस्थेनं विचारपुस करणाऱ्या मा.@AUThackeray साहेब आणि मा. महापौर @KishoriPednekar यांचे आभार!'' असे ट्विट करून त्यांनी पालिका, महापौर आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. सोबतच पर्यटन मंत्री अनिल परब आणि सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांचेही आभार मानले आहे.'आज आम्हा रहिवाश्यांचं एक स्वप्नं तुम्ही पूर्ण केलंत! आम्हाला आमच्या हक्काचं पाणी दिलंत… यापुढेही आपले असेच सहकार्य मिळेल हिच अपेक्षा! खूप खूप धन्यवाद! ' असेही तो म्हणाला आहे.
Web Title: Director Hemant Dhome Tweet On Mumbai Bmc For Water Crisis In Goregaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..