जी विदेशी बॅग घेण्याचं असतं तरुणींचं स्वप्न, त्याची पहिली भारतीय ब्रँड अँम्बेसिडर दीपिका|Deepika Padukone Louis Vuitton international brand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone

जी विदेशी बॅग घेण्याचं असतं तरुणींचं स्वप्न, त्याची पहिली भारतीय ब्रँड अँम्बेसिडर दीपिका

Deepika Padukone Brand Ambassador: तुम्ही जर बॉलीवूडच्या दीपिका पदुकोणचे फॅन असाल तर तुम्हाला तिच्याबद्दल एक गोष्ट माहिती असायला हवी. (Bollywood Actress) ती म्हणजे दीपिका पदुकोण एका बड्या बॅगच्या कंपनीची ब्रँड अँम्बेसिडर झाली आहे. ती कंपनी तिच्या ब्रँडेड बॅगसाठी लोकप्रिय आहे. (Deepika paduokone) दीपिकापूर्वी एकाही भारतीय अभिनेत्रीच्या वाट्याला ही अॅम्बेसिडरशिप आलेली नाही. सध्या दीपिकावर सोशल मीडियातून कौतुकाचा (Bollywood News) वर्षाव होतो आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाही मिळाल्या आहेत. दीपिकानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर करुन त्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. दीपिकानं एक गोड बातमीही चाहत्यांना दिली आहे ती म्हणजे यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये तिला ज्युरी होण्याचा बहुमानही मिळाला आहे.

बॉलीवूडमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असण्याचा मान दीपिकाकडे आहे. तिनं गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहुन चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्याचा परिणाम असा की, तिच्या इंस्टावरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या एका सर्व्हेतून मिळालेल्या माहितीतून भारतात इंस्टावर सर्वाधिक फॉलअर्स असणाऱ्यांच्या यादीत दीपिकाचा क्रमांक वरचा आहे. आती ती वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिला एका विदेशी बॅग प्रॉडक्टची ब्रँड अम्बेसिडर होण्याची संधी मिळाली आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे.

Deepika Padukone post

Deepika Padukone post

चाहत्यांना दीपिकाच्या या कामगिरीबद्दल तिच्या पोस्टमधून कळले तेव्हा त्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाही दिल्या आहेत. 36 वर्षांची दीपिका ही आता लग्झरी ब्रँड लुई विटॉन या जगप्रसिद्ध बॅग कंपनीची ब्रँड अम्बेसिडर झाली आहे. त्यात तिच्यासोबत क्रुएला फेम अभिनेत्री एम्मा स्टोन आणि चीनी अभिनेत्री झोऊ डोंग्यु या देखील सहभागी होणार आहेत. दीपिकानं तिच्या इंस्टावरुन एक प्रेस रिलिज व्हायरल केली आहे. त्यामध्ये तिनं तो फोटोही चाहत्यांसाठी शेयर केला आहे. 2020 च्या प्री फॉलमध्ये सहभागी झाली असून माझ्यासमवेत कलाकार निकोलस गेस्विएरही होते. आता लुई विटॉनसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा: Lockupp Viral Video: पुनम पांडेचा कहर, सगळ्यांसमोर कपडे काढून केली आंघोळ

यापूर्वी दीपिकानं एका फ्रेंच ब्रँडसोबत काम केलं होतं. त्यानंतर तिला लुईसचा ब्रँड मिळाला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री झाली आहे. तिच्यानंतर गेम ऑफ थ्रोन्सची सोफी टर्नर यासारख्या इतर अभिनेत्रींना देखील अशी संधी मिळाली होती. आपल्यासाठी एवढ्या मोठ्या कंपनीचा भाग होता येणं ही आनंदाची बाब आहे असं दीपिकानं म्हटलं आहे.

Web Title: Deepika Padukone Louis Vuitton International Brand First Indian Ambassador Share Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top