Lockupp Viral Video: पुनम पांडेचा कहर, सगळ्यांसमोर कपडे काढून केली आंघोळPoonam Pandey bathing video in Lock Upp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poonam Pandey bathing video in Lock Upp

Lockupp Viral Video: पुनम पांडेचा कहर, सगळ्यांसमोर कपडे काढून केली आंघोळ

कंगना रनौत(Kangana ranaut) होस्ट करत असलेला 'लॉकअप'(LockUpp) रिअॅलिटी शो गेल्या काही दिवसांपासून भलताच चर्चेत आहे. सध्या बऱ्याच घडामोडी शो मध्ये होताना दिसत आहेत. शो मध्ये काही जण आपल्या रागासाठी ओळखले जातात तिथे पूनम पांडे(Poonam Pandey) घरात बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. पुनम कितीतरी वेळा मर्यादा ओलांडताना दिसली आहे. आता पूनमचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात तिनं लाज-शरमेच्या सगळ्याच हद्द पार केल्या आहेत. यामध्ये चक्क जेलमधील इतर कैद्यांसमोर तिनं आंघोळ केली आहे. (Poonam Pandey bathing video in Lock Upp)

हेही वाचा: धनुषला मद्रास High Court चे समन्स, 5 वर्ष जुनं बायलॉजिकल आई-वडील प्रकरण

'लॉकअप' शो आता हळूहळू फिनालेच्या दिशेनं प्रवास करीत आहे. कंटेस्टंट जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाताना दिसत आहेत. यातच आता पूनम पांडेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतान दिसत आहे. या व्हिडीओत ती इतर कैद्यांसमोर चक्क आंघोळ करताना दिसत आहे. तसं हे पूनमसाठी काही नवी नाही. तिनं एकदा जेलमधील कॅमेऱ्यासमोर कपडे काढून दाखवलेच होते चाहत्यांसाठी. पण आता कॅमेऱ्यासमोर चक्क आंघोळ केलेला तिचा हा व्हिडीओ हैराण करुन सोडणारा आहे.

आपल्या माहितीसाठी सांगतो की शिवम शर्माने सगळ्यांसमोर आंघोळ करायचा प्लॅन केला होता. तो तिथेच बादलीत पाणी घेऊन यार्डमध्ये सगळ्यांसमोर आंघोळ करायला लागतो. यावेळी शिवम शर्टलेस झाला आहे पण त्यानं पॅंट घातली आहे. यादरम्यान सायशा शिंदे आणि पायल शिवमच्या समोर बसून तो आंघोळ करताना पाहत बसल्यात आणि त्याला म्हणत आहेत,''पॅंट घालून कोण आंघोळ करतं''. बस्स,तेवढ्यात पुनम पांडेची एन्ट्रूी होते. आणि ती देखील शिवम सोबत आंघोळ करण्याचं ठरवते. ती म्हणते,''मी आंघोळ कॅमेऱ्यासमोर माझ्या चाहत्यांसाठी करीत आहे''. पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Web Title: Poonam Pandey Bathing Video From The Sets Of Lock Upp Has Gone Viral On Social

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top