const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Tiger Vs Pathaan: यशराजच्या नव्या सिनेमात ना दीपिका..ना कतरिना..भलतीनंच लावला नंबर..जाणून घ्या अपडेट

यशराज फिल्म्सच्या आगामी 'टायगर वर्सेस पठाण' या स्पाय मुव्हीमध्ये शाहरुख-सलमानसोबत एकच अभिनेत्री असणार अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.
Tiger V/S Pathaan Update
Tiger V/S Pathaan UpdateEsakal

Tiger V/S Pathaan Update: बॉलीवूडमध्ये सध्या यशराज फिल्म्सच्या आगामी 'टायगर वर्सेस पठाण' या स्पाय मुव्हीची चर्चा रंगली आहे. 'पठाण' नंतर शाहरुख आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. यावेळी पडद्यावर पठाण आणि टायगर भिडलेले दिसणार आहेत.

पण अद्याप सिनेमातील अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. सिनेमात दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफ दोघीही आपला जलवा दाखवताना दिसणार की कोणी एकच अभिनेत्री असणार यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

यशराज फिल्मशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार 'टायगर वर्सेस पठाण' साठी फक्त सलमान खान,शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंदचं नाव निश्चित करण्यात आलं आहे, सिनेमाचा मुख्य व्हिलन आणि अभिनेत्रीच्या नावावर अजूनही विचार चालू आहे. तसंच,इतर कलाकारांचे कास्टिंग होणे बाकी आहे. (Deepika padukone Or Katrina Kaif who will be leading actress in tiger vs pathaan shahrukh khan salman khan)

Tiger V/S Pathaan Update
Amitabh Bachchan: खूप कमी वयात अमिताभना घडलेली चांगलीच अद्दल,म्हणूनच सिगारेट,दारुपासून दहा हात लांब राहतात शहनशाह..

कतरिना कैफ 'टायगर' सीरिजमध्ये मुख्य अभिनेत्री आहे तर दीपिका पदुकोणनं 'पठाण' मध्ये आपल्या ग्लॅमरनं सर्वांना थक्क केलं आहे. बातमी आहे की यावेळी 'टायगर वर्सेस पठाण'मध्ये कोणत्यातरी एकाच अभिनेत्रीला घेतलं जाईल. अर्थात सिनेमात 'टायगर' आणि 'पठाण' या व्यक्तीरेखांचा ग्राफ कसा असेल त्यावरच हे सगळं अवलंबून असेल.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार यावेळी 'टायगर वर्सेस पठाण' मधनं दीपिका आणि कतरिना दोघींना डिच्चू दिला जाऊ शकतो. जर अभिनेत्रींना खास काही काम सिनेमात नसेल तर मेकर्स या दोन्ही बड्या अभिनेत्रींना कास्ट करण्याचा निर्णय घेणार नाहीत. पण बोललं जात आहे की सिनेमात ग्लॅमरचा तडका द्यायला दोन्ही खान्ससोबत एक अभिनेत्री तरी नक्कीच दिसू शकते.

Tiger V/S Pathaan Update
Shruti Haasan:'मायनस डिग्री टेम्प्रेचरमध्ये पातळ साडीवर अभिनेत्रींना नाचवता आणि ..', श्रुतीनं दिग्दर्शकांना सुनावलं

यशराज फिल्म्सचे स्पाय सिनेमे गेल्या काही वर्षांपासून बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहेत. २०१२ साली सर्वात आधी सलमान खानचा 'एक था टायगर' सिनेमा रिलीज झाला होता.

या सिनेमानं जोरदार कमाई केली होती. सिनेमाच्या यशाला पाहून मेकर्सनी २०१७ मध्ये 'टायगर जिंदा है' बनवला,जो हिट ठरला. यशराज फिल्म्सने हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा 'वॉर' आणला ज्याच्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आणि आता शाहरुखच्या 'पठाण' सिनेमानं देखील अनेक रेकॉर्ड तोडत तगडी कमाई केली आहे.

Tiger V/S Pathaan Update
Shruti Haasan:'मायनस डिग्री टेम्प्रेचरमध्ये पातळ साडीवर अभिनेत्रींना नाचवता आणि ..', श्रुतीनं दिग्दर्शकांना सुनावलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com