Pathan: दीपिकाच्या हातात दिसली बंदूक, शाहरुखही म्हणाला,'खतरनाक...' Deepika Padukone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone's look revealed in Pathaan poster, Shah Rukh Khan calls it 'guns and grace galore'

Pathan: दीपिकाच्या हातात दिसली बंदूक, शाहरुखही म्हणाला,'खतरनाक...'

शाहरुख खानचा(Shahrukh Khan) बहुचर्चित पठाण(Pathan) सिनेमातून दीपिका पदुकोणचा(Deepika Padukone) फर्स्ट लूक(First Look) समोर आला आहे. दीपिका पदूकोण या लूकमध्ये एकदम खतरनाक दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. मेकर्सनी दीपिकाच्या फर्स्ट लूकचा पोस्टर रिलीज केला आहे,ज्यात एका हातात बंदूक घेऊन कोणावर तरी निशाणा साधताना अभिनेत्री दिसत आहे. शाहरुखनंही हे पोस्टर शेअर करत म्हटलं आहे,'धमकावणारी खूपच सुंदर...'(Deepika Padukone's look revealed in Pathaan poster, Shah Rukh Khan calls it 'guns and grace galore')

हेही वाचा: Koffee With karan 7 शो ची कार्तिकने उडवली खिल्ली, म्हणाला, 'मला अभिमान....'

मेकर्सनी दीपिका पदूकोणचा लूक रिलीज करताना लिहीलं आहे,''थांब, लक्ष्य निश्चित कर आणि मग शूट कर. तुम्हाला मारण्यासाठी हिला बुलेटची गरज नाही''. दीपिकाचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांचे हृदयाचे ठोके मात्र वाढले आहेत. चाहत्यांना आता पठाणच्या रिलीजविषयी उत्सुकता वाढली आहे. पठाण सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण सोबतच जॉन अब्राहम आणि डिंपल कपाडियां देखील दिसणार आहेत.

हेही वाचा: Hijab: 'याच कारणानं मी हिजाबचा स्विकार केला', अखेर सना खानने सोडलं मौन

पठाण मधील दीपिकाचा फर्स्ट लूक शाहरुख खान आणि जॉन अब्राहमने देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. आणि लिहिलं आहे,''अजून ६ महिने वाट पहा...''

पठाण २५ जानेवारी, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर यावर्षी नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात रिलीज केला जाणार आहे. पठाण सिनेमा हिंदीसोबतच तामिळ,तेलुगू भाषांतही रिलीज केला जाणार आहे. पठाण मधील शाहरुखच्या लूकनेही आपला खतरनाक अवतार याआधी दाखवला आहे. या सिनेमात शाहरुखनेही आपल्या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतलेली दिसतेय. त्यानं पुन्हा एकदा आपल्या बॉडीवर चांगलेच काम केलेले दिसत आहे. शाहरुखने फिटनेस ट्रेनर प्रशांत सुभाषच्या मुलाखतीत सांगितलं होतं की पठाण च्या व्यक्तिरेखेला साजेशी बॉडी बनवण्यासाठी त्याला दोन वर्ष लागली आहेत.

ओम शांती ओम,चेन्नई एक्सप्रेसनंतर शाहरुखचा दीपिकासोबत हा तिसरा सिनेमा आहे. दीपिकाही पठाण साठी भलतीच उत्सुक आहे. शाहरुखच्या सिनेमातूनच दीपिकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Web Title: Deepika Padukones Look Revealed In Pathaan Poster Shah Rukh Khan Calls It Guns And Grace

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top