
Devmanus मालिकेतील टोन्याचं दहावीचं मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल..विज्ञान विषयात मिळालेयत अव्वल गुण..
Devmanus: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परिक्षेचा निकाल नुकताच लागला. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी तुलनेनं निकाल फार काही चांगला लागलेला नाही अशी ओरड जिकडे तिकडे सुरु आहे. पण या परिक्षेत हवं तसं यश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला मात्र पारावर उरलेला नाही.
यादरम्यान 'देवमाणूस' मालिकेतील बालकलाकर विरल माने याच्या दहावीच्या निकालाची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झालेली दिसत आहे. मालिकेत 'ढ' दिसणारा खट्याळ टोन्या म्हणजेच विरल माने यानं प्रत्यक्षात दहावीच्या परिक्षेत किती गुण मिळवलेयत चला जाणून घेऊया..(Devmanus fame child artist viral mane 10th marksheet)
'देवमाणूस' या मालिकेत सर्वच कलाकार नवीन होते. पण प्रत्येकानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. त्यामुळे आजही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांना आठवतायत ते मालिकेतील डॉक्टर,बज्या,नाम्या,टोन्या, डिंपल,आजी, मंगल ताई, बाबू दादा...त्यात टोन्या आणि आजीमध्ये रंगणारे सीन्स तर भन्नाट असायचे. त्या दरम्यान आता बातमी आहे की टोन्या दहावी पास झाला आहे.
टोन्याचा दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ज्यानं त्यानं त्याला मिळालेले गुण पाहून तोंडात बोटं टाकली आहेत. टोन्या म्हणजे प्रत्यक्षातला विरल माने. भूमिकेमुळे प्रेक्षकांनी तो फार काही हुशार असेल असा अंदाज बांधलाच नव्हता बहुधा.
म्हणूनच विरल माने उर्फ टोन्या याला ७८ टक्के गुण दहावीत मिळाल्याचं पाहून चाहत्यांना त्याचे कौतूक वाटत आहे. विरलला दहावीत विज्ञान विषयात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत. एकूण ५०० पैकी ३९० गुण टोन्या म्हणजेच विरल मानेला मिळाले आहेत.
'देवमाणूस' या मालिकेतील टोन्याची भूमिका आपल्याला कशी मिळाली याविषयी विरल माने एका मुलाखतीत म्हणाला होता की,''माझा आणि अभिनयाचा संबंध नृत्याच्या आवडीमुळे आला. त्यात लॉकडाऊनमध्ये सातारच्याच एका कुटुंबाकडून ऑडिशनविषयी कळले. मी ती दिली आणि काही दिवसांनी सिलेक्शनचा फोन आला. सेटवर आपण लहान असल्यामुळे आपले खूप लाड व्हायचे'',असं देखील तो म्हणाला होता.