'गोपी बहू'च्या घरी वाजणार सनई-चौघडे; लग्नाविषयी दिली माहिती 

Devoleena Bhattacharjee
Devoleena Bhattacharjee

'साथ निभाना साथिया' या प्रसिद्ध मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी लग्नबंधनात अडकणार आहे. याविषयी खुद्द तिनेच माहिती दिली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत देवोलीनाने तिच्या लग्नाविषयी व होणाऱ्या पतीविषयी सांगितलं. "मी पुढच्या वर्षी लग्न करण्याचा विचार करतेय. मी या गोष्टींबद्दल फार काही बोलत नाही. कारण लोकांना सांगितलं की नजर लागते आणि अशा गोष्टींवर माझा विश्वास आहे. सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडल्या की मी स्वत:हून मनमोकळेपणाने बोलेन", असं ती म्हणाली. 

यावेळी देवोलीनाने तिच्या होणाऱ्या पतीचं नाव सांगितलं नाही. "तो टीव्ही इंडस्ट्री किंवा मनोरंजन क्षेत्रातला नाही. तो व्यावसायिक आहे आणि मला जसा जोडीदार हवा तसाच तो आहे. मला नेहमीच इंडस्ट्रीबाहेरचा जोडीदार शोधायचा होता. घरी गेल्यावर मी त्या व्यक्तीसोबत इंडस्ट्रीपेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टींवर बोलू शकेन आणि ऐकू शकेन, अशी माझी अपेक्षा होती. सुदैवाने माझ्या अपेक्षेनुसार मला जोडीदार भेटला. तो खूपच साधा आहे", असं तिने सांगितलं.  

'साथ निभाना साथिया' या मालिकेतून देवोलीना घराघरात पोहोचली. मनोरंजन क्षेत्रात असताना देवोलीनाला तिच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा करायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या देवोलीनाने कधीच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो पोस्ट केले नाहीत. मालिकेनंतर तिने २०१९ मध्ये 'बिग बॉस १३' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. अभिनयासोबतच देवोलीना नृत्यांगनासुद्धा आहे. तिने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे.   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com