Captain Miller : धनुषचा नवा चित्रपट, चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhanush

Captain Miller : धनुषचा नवा चित्रपट, चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

बाॅलीवूडचे साधारणपणे चित्रपटे प्रत्येक वेळी दक्षिणेच्या मास्टरपीस चित्रपटांसमोर फिके पडताना दिसत आहेत. आता असे वाटते की दक्षिणेकडून आणखी एक वादळ येणार आहे, जे बाॅलीवूडच्या (Bollywood) चित्रपटांना मागे टाकेल. जेव्हा कधी धारदार अभिनयाची गोष्ट येते तेव्हा धनुषच्या (Dhanush) नावाची सर्वात कमाल अभिनेता म्हणून गणना होते. धनुषने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करत, त्याचा एक टिझर व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. (Dhanush In Captain Miller First Look Of Teaser Video Out)

हेही वाचा: PHOTOS | रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर बनले विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष

बाइकर लुकमध्ये दिसला धनुष

धनुषने नुकताच सोशल मीडियावर आपला आगामी चित्रपट 'कॅप्टन मिलर' चे (Captain Miller) टीझर व्हिडिओ शेअर केले आहे. त्यात तो जुन्या काळातील एका बाइकरच्या लूकमध्ये दिसत आहे. धनुषने आपल्या आगामी चित्रपटाचे टिझर व्हिडिओ शेअर करत लिहिले, हे खूपच उत्साहवर्धक राहणार आहे. कॅप्टन मिलरबाबत मी खूपच जास्त रोमांचित आहे.

हेही वाचा: ज्ञान कुठूनही मिळवा, मात्र त्याची खात्री करुन घ्या; बच्चन यांचा कानमंत्र

टीझर पाहून चाहतेही उत्साहित

या व्हिडिओवर लोकांनी मोठ्याप्रमाणावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. टिझर व्हिडिओ पाहाताच चाहते खूपच उत्साहात दिसले. लोकांनी प्रतिक्रिया देऊन स्टोरी लाईन आणि इतर बाबींविषयी सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरम करत आहेत. साथिया ज्योथी फिल्म्स बॅनर अंतर्गत हा चित्रपट बनत आहे.

Web Title: Dhanush In Captain Miller First Look Of Teaser Video Out

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..