Dhanush : आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणीची धनुषने केली मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bonda Mani Latest News

Dhanush : आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणीची धनुषने केली मदत

Bonda Mani Latest News धनुष आणि विजय सेतुपतीने आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणी यांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी एक लाखाची मदत केली आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार समाजसेवा करीत असतात. आपल्या व्यवसायमधील कलाकारांना मदत करणे पण समाजसेवा पेक्षा वेगळे नाही.

कॉलिवूडचा (कर्नाटक) सुप्रसिद्ध कॉमेडियन बोंडा मणी सध्या चेन्नईतील ओमंडूर सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याने आयुष्याशी झुंज देत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ते वैद्यकीय खर्चासाठी संघर्ष करीत आहे. त्यांच्या वैद्यकीय बिलांसाठी धनुषने एक लाखाची आर्थिक मदत दिली आहे. कॉमेडियनने स्टारचे मदतीबद्दल आभार मानले.

हेही वाचा: Mukesh Khanna : तू सासू-सुनेचे शो बनवून....; मुकेश खन्ना पुन्हा एकता कपूरवर संतापले

यापूर्वी विजय सेतुपती यांनी बोंडा मणी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाखाची देणगी दिली होती. या व्यतिरिक्त अभिनेता वादिवेलूनेही आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. कॉमेडियन बोंडा मणी यांनी सोशल मीडियावर अश्रुपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओतून त्यांनी सहकलाकराकडून मदत मागितली आहे.

टॅग्स :Actordhanush