'धर्मवीर' Trailer: 'हिंदू असणं गुन्हा झालायं, बहुसंख्य आहोत पण...'|Dharmaveer Mukkam Post Thane Marathi Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Dharmaveer Mukkam Post Thane Marathi Movie Anand Dighe Trailer Viral social media yst8

'धर्मवीर' Trailer: 'हिंदू असणं गुन्हा झालायं, बहुसंख्य आहोत पण...'

Marathi Movie: मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. त्याला (Bollywood Movie) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रसाद ओक यांनी या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री (Marathi Actor) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग केले होते. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. आज सोशल मीडियावर धर्मवीरचा ट्रेलक प्रदर्शित झाला असून आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता आहे. जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. त्यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. प्रविण तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. आजवर अनेक दर्जेदार आणि एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या १३ मे रोजी 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा ! आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत.

हेही वाचा: 'मास्टरशेफ' अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल! - Video Viral

प्रसाद ओक यांनी साकारलेले आनंद दिघे पाहून अनेकांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले आहे. ज्यावेळी मुंबईमध्ये धर्मवीरच्या ट्रेलरचे लाँचिंग झाले तेव्हा तो ट्रेलर पाहून अनेकजण भावूक झाले होते. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांर आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच आनंद दिघे यांच्या जीवनाचं ब्रीद होतं. आपल्या एका मुलाखतीमध्ये प्रसाद ओक यांनी सांगितलं होतं की,पडद्यावर आनंद दिघे साकारणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यासाठी विशेष तयारी करावी लागली. केवळ लूकवर भर देऊन जमत नाही तर त्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्यात यावी यासाठी मेहनत घ्यावी लागते.

Web Title: Dharmaveer Mukkam Post Thane Marathi Movie Anand Dighe Trailer Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top