dharmveer movie trailer launch
dharmveer movie trailer launch sakal

Dharmveer trailer launced : ठाकरे - खान एकाच मंचावर

या सोहळ्याला सलमानने केवळ हजेरी लावली नाही तर त्याने मराठीतून संवादही साधला.

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न (Marathi Movie) सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारत असून त्यांचा पहिला लुकसमोर आल्यापासून चित्रपटबाबतअधिकच उत्सुकता वाढली आहे. शनिवारी या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला.

dharmveer movie trailer launch
वीस लाखांची रोकड उचलून मूनव्वर फारूकी ठरला ‘लॉक अप’ चा विजेता..

प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tarde) यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील गुरुपौर्णिमेचे गाणे आणि आणि टीजर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता उत्कंठा आहे ती 13 मे ची. अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट रिलीज होणार आहे. शनिवार वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेल मध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत दिमाखदार पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

dharmveer movie trailer launch
Photo: पाहा 'सायली संजीव'च्या काही खास साड्या आणि स्टाईलिश ब्लाउज..

यावेळी प्रसाद ओक याने आनंद दिघे यांच्या संग्रही असलेल्या पांढऱ्या गाडीतून एंट्री घेतली. प्रसादला आनंद दिघे (anand dighe) यांच्या रूपात पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या सोहळ्यात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला चाफ्याची फुले अर्पण करण्यात आली.

बॉलीवुड अभिनेता सलमान खान हा या सोहळ्याचे पप्रमुख आकर्षण ठरला. या सोहळ्याला सलमानने केवळ हजेरी लावली नाही तर त्याने मराठीतून संवाद साधला. चित्रपटाचे कौतुक केले. सलमान सोबतच अभिनेता रितेश देशमुख, जॅकी श्रोफ, अर्षद वारसी, कश्मिरा शाह आणि मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com