
भारताचा विश्वकरंडक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे क्रिकेटच्या मैदानावरचे भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे पण मनोरंजनाच्या ( एंटरटेनमेंटच्या) खेळपट्टीवर त्याने नव्या इनिंगसाठी मुंबईतच गार्ड (खेळण्याचा पवित्रा) घेतला आहे.
मुंबई: भारताचा विश्वकरंडक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे क्रिकेटच्या मैदानावरचे भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे पण मनोरंजनाच्या ( एंटरटेनमेंटच्या) खेळपट्टीवर त्याने नव्या इनिंगसाठी मुंबईतच गार्ड (खेळण्याचा पवित्रा) घेतला आहे. त्याची तयारी एवढी जोरदार आहे की धोनी एंटरटेनमेंट कंपनीचे कार्यालय मुंबईत अंधेरीत सुरूही झाले आहे.
वास्तवित पहाता क्रिकेटच्या या माहीने धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गेल्या वर्षीच स्थापन केली होती. हा व्यवसाय बॉलिवूडची महानगरी अर्थात मुंबईतून विस्तारित करण्यासाठी त्याने अंधेरीत नवे कार्यालय सुरु केले. धोनीची पत्नी साक्षी यात अधिक लक्ष घालणार आहे . त्यामुळे साक्षी आणि सुरज सिंग हे या कंपनीतील भागीदार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवरून टीव्हीसाठी कार्यक्रम तयार करण्याचा त्यांचा बिझनेझ असणार आहे.
हेही वाचा: 'लालबागच्या राजा'चा गणेशोत्सव रद्द, मंडळ जपणार सामाजिक भान
या अगोदर बनिजय एशिया या एका प्रमुख प्रोडक्शन हाऊसबरोबर धोनीच्या कंपनीची भागीदारी होती. त्यात दीपक धर यांचाही समावेश होता. `रोअर ऑफ दि लायन` ही हॉटस्टारसाठी लघू फ्लिम त्यांनी तयार केली होती.
धोनी दि अनटोल्ट स्टोरी या गाजलेल्या बायोपिकनंतर करमणूक क्षेत्रासाठी काही तरी करत रहायचे हा विचार मी केला होता. नवनव्या कल्पना पुढे येत होत्या काही तर इतक्या आगळ्या वेगळ्या होत्या की त्याचा विचारही कधी केला नव्हता असे धोनीने सांगितले आहे.
हेही वाचा: टीव्ही मालिकांप्रमाणेच आता 'वेबसीरीज'चे शूटिंगही घरच्या घरी
हा संयुक्तिक उपक्रम भारत आणि दक्षिणपूर्व आशिया मार्केटसाठी असेल. पूर्णपणे डिजिटलरवर आधारित असेल. आता या प्रकाराला अधिक मागणी येत आहे, असे धर यांनी सांगितले.
dhoni started his new inning in field of entertainment