दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरकडून 200 किलो गांजा जप्त

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

एनसीबीनं जे कारवाई केली त्यात बांद्रा येथून एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आला होता.

मुंबई - एनसीबीनं ( नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ड्रग्जच्या केसमध्ये आणखी एकाला पकडले आहे. बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री दिया मिर्झा हिचा एक्स मॅनेजरकडून तब्बल 200 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या सेलिब्रेटींची नावे या ड्रग्ज प्रकरणात समोर आली होती. आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. यामुळे कोणी काही म्हणाले तरी बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींचे ड्रग्ज कनेक्शन असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

राहिला फर्निचरवाला असे अटक करण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासहित आणखी चार व्यक्तिंनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये राहिलाची बहिण शाईस्ता आणि दोन ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. यासगळ्यांकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. डीएनएकडून मिळालेल्या माहितीनुसार राहिला फर्निचरवाला आणि त्याची बहिण शाईस्ता यांच्या जवळ गांजा मिळून आला. सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे, एनसीबीनं जे कारवाई केली त्यात बांद्रा येथून एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आला होता. याशिवाय जसवंत हाईटस जे खार येथे आहे तेथील नागरिक करण सजनानी (ब्रिटीश नागरिक) यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - ट्रम्प यांच्या ट्विटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद

या लोकांकडून गांजा जप्त करण्यात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राहिला फर्निचरवाला आणि त्याची बहिण शाईस्ताच्या घरातून 200 किलो गांजा जप्त करण्यात आला. अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण पुढे आला होता. यानंतर बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यात अनेक सेलिब्रेटींची नावे समोर आली होती. सुशांतच्या तपासानं घेतलेल्या वेगळ्या वळणानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अजूनही हे प्रकरण काही शांत झालेले नाही. त्यात दरवेळी नवनवीन नावे पुढे येत आहेत. 

' तुला फक्त पुरुषांचे कपडे घालायचे आहेत '

यापूर्वी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रध्दा कपूर, रकुलप्रीत सिंह यांच्याबरोबर इतर काही कलाकारांना चौकशीसाठी बोलावले होते. तसेच अर्जुन रामपाल. करण जोहर. कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाडिया यांचीही नावे समोर आली होती. 
 
 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dia mirza ex manager rahila furniturewala ncb arrests in drugs case 200 kg marijuana seized